01 March 2021

News Flash

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी करोना पॉझिटिव्ह

काल एका कार्यक्रमात भाषण करताना चक्कर येऊन स्टेजवर कोसळले होते.

संग्रहीत

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काल (रविवार) सायंकाळी एका कार्यक्रमात भाषण करत असतानाच त्यांना चक्कर आल्याने ते स्टेजवर कोसळले होते. ६४ वर्षीय विजय रुपानी २०१६ पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.

विजय रुपानी यांची प्रकृती सध्या स्थिर असून ब्लड प्रेशर कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.  त्यांना अहमदाबादमधील युएन मेहता रुग्णालयात नेलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विजय रुपानी वडोदरा येथील नझीमपुरा परिसरात आयोजित रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याचवेळी हा सगळा प्रकार घडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 1:31 pm

Web Title: gujarat chief minister vijay rupani tests positive for covid19 msr 87
Next Stories
1 टर्की काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या तयारीत; पाकिस्तानसोबत भारताविरुद्ध रचला मोठा कट
2 टूलकिट प्रकरण: ‘दिशा’नंतर निकिता जेकब यांच्याविरुद्ध अटक वॉरंट
3 Shame on you China : म्यानमारमधील सत्तांतरणाविरोधात चिनी दूतावासासमोर नागरिकांचे आंदोलन
Just Now!
X