27 February 2021

News Flash

…अन् भाषण सुरु असतानाच गुजरातचे मुख्यमंत्री स्टेजवर कोसळले

विजय रुपानी २०१६ पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत

संग्रहीत

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी भाषण सुरु असतानाच स्टेजवल कोसळले. रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात त्यांचं भाषण सुरु होतं. भाषण सुरु असतानाच अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना सध्या सरकारी विमानातून अहमदाबादला नेलं जात आहे. ६४ वर्षीय विजय रुपानी २०१६ पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.

विजय रुपानी यांची प्रकृती सध्या स्थिर असून ब्लड प्रेशर कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विजय रुपानी यांना अहमदाबादमधील युएन मेहता रुग्णालयात नेलं जाणार असून तिथे पूर्वकाळजी म्हणून त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विजय रुपानी वडोदरा येथील नझीमपुरा परिसरात आयोजित रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याचवेळी हा सगळा प्रकार घडला.

दरम्यान विजय रुपानी यांनी वडोदरा येथील आपल्या भाषणादरम्यान आपलं सरकार गुजरातमध्ये धर्मांतराला रोखणारा कायदा आणणार असल्याचं आश्वासन दिलं. यावेळी ते म्हणाले की, “केंद्रातील भाजपा सरकारने आपली सर्व आश्वासनं पूर्ण केली आहेत. गुजरातच्या विकासाच्या आपण शिखरावर आहोत. गुजरातची प्रतिमा वाढवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 7:39 am

Web Title: gujarat cm vijay rupani faints on stage during speech sgy 87
Next Stories
1 पर्यावरणवादी तरुणी अटकेत
2 ‘जैश’चा दिल्लीत हल्ल्याचा कट
3 लष्करात स्वदेशी ‘अर्जुन’
Just Now!
X