News Flash

‘अफजल का यार, देश का गद्दार’; राहुल गांधींवर पोस्टर वार

मोदींच्या भाषणानंतर अहमदाबादमध्ये पोस्टर

‘अफजल का यार, देश का गद्दार’; राहुल गांधींवर पोस्टर वार
छायाचित्र सौजन्य- एएनआय

गुजरातमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. अहमदाबादमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दहशतवादी अफझल गुरुचे समर्थक काँग्रेसचे कथित नेते सलमान निजामी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘अफजल का जो यार है, वो देश का गद्दार है,’ असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी निजामी यांच्या उल्लेख करत काँग्रेसवर शरसंधान साधल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे पोस्टर पाहायला मिळाले आहे. मात्र या पोस्टरवर भाजपचा उल्लेख नाही.

अहमदाबादच्या मुख्य भागातील एका बस स्थानकावर राहुल गांधी आणि सलमान निजामी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या निजामी यांचा राहुल गांधींसोबतचा फोटो आहे. यासोबतच निजामी यांचे वादग्रस्त ट्विटदेखील पोस्टरवर छापण्यात आले आहे. ‘तुम कितने अफजल मारोगे, हर घऱ से अफजल निकलेगा,’ असे ट्विट या पोस्टरवर दाखवण्यात आले आहे.

‘अफजल का जो यार है, वो देश का गद्दार है,’ असा मजकूर या पोस्टरवर आहे. निजामी काँग्रेससाठी प्रचार करत असल्याचा स्पष्ट उल्लेख या पोस्टरवर आहे. या पोस्टरवर निवेदक म्हणून सरदार पटेल एकता संघ या संघटनेचे नाव आहे. शनिवारी लुनावाडामध्ये सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलमान निजामी यांच्या विधानावरुन काँग्रेसवर तोफ डागली होती. ‘काँग्रेसचे नेते सलमान निजामी हे त्यांचे स्टार प्रचारक आहेत. ते मूळचे काश्मीरचे आहेत. ते म्हणतात, त्यांना स्वतंत्र काश्मीर हवा आहे. ते म्हणतात, सैन्याचे जवान बलात्कार करतात. काँग्रेसचा तो युवा नेता म्हणतो, प्रत्येक घरातून अफजल बाहेर पडेल,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी निजामी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते.

मोदींच्या या शाब्दिक हल्ल्यानंतर निजामी यांनी स्पष्टीकरण दिले होते. पंतप्रधानांनी आपल्या बोगस ट्विटचा उल्लेख केल्याचे त्यांनी म्हटले. ‘मी गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहे. मात्र मोदींनी ज्या विधानाबद्दल भाष्य केले, ते बोगस आणि खोटे आहे. मी पोलिसांकडे त्याबद्दलची तक्रारदेखील केली आहे,’ असे निजामी यांनी म्हटले. तर मोदींच्या टीकेला उत्तर देताना निजामी काँग्रेसचे सदस्यच नसल्याचा दावा काँग्रेसने केला होता. ‘सलमान निजामी कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही. ते काँग्रेसमध्ये कोणत्याही पदावर नाहीत,’ असे काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 9:35 am

Web Title: gujarat election assembly election 2017 poster slamming afzals yaar salman nizami with rahul gandhi appears in ahmedabad
Next Stories
1 जम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
2 कडाक्याच्या थंडीत पहिल्यांदाच डोकलाम भागात १८०० चिनी सैनिक तैनात
3 गुजरात निवडणुकीत मुस्लीम दुर्लक्षितच
Just Now!
X