News Flash

शहरांनी तारले

शहरांमधील या ५५ पैकी काँग्रेसला १२ जागांवरच विजय मिळवता आला.

भारतीय जनता पार्टी ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोटमध्ये भाजपला मोठे यश

गुजरातमध्ये सत्तेसाठी शेवटपर्यंत भाजपला संघर्ष करावा लागला. बहुमताला आवश्यक असलेला ९२ आकडा भाजपने ओलांडला खरा मात्र केंद्रात सत्ता असताना त्यांना शेवटपर्यंत झुंजावे लागले. मात्र अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट व भावनगर या प्रमुख शहरातील मतदारांनी ४३ जागा भाजपच्या पदरात पडल्याने सलग सहाव्यांदा त्यांना सत्ता मिळवता आली. शहरांमधील या ५५ पैकी काँग्रेसला १२ जागांवरच विजय मिळवता आला.

गुजरात प्रारूप, शहरांमध्ये निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा, कायदा व सुव्यवस्थेची उत्तम स्थिती तसेच भाजपच्या पन्नाप्रमुखांचे जाळे याच्या जोरावर भाजपने शहरांमधील आपल्या जागा राखल्या. पाटीदार आंदोलनामुळे शहरांमध्ये हार्दिक पटेलच्या साथीने काँग्रेसला यशाची अपेक्षा होती. मात्र गेल्या वेळच्या तुलनेत जागा वाढल्या असल्या तरी भाजपची सत्ता हिसकावून घेता येईल इतपत त्यांना मजल मारता आली नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र महापालिका भाजपने राखल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.

सुरतमध्ये पाटीदार आंदोलनाचा फटका बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र शहर परिसरातील १५ पैकी केवळ दोन जागा काँग्रेसला जिंकता आल्या. गांधीनगरमध्ये भाजपला धक्का बसला. गांधीनगर उत्तरमध्ये काँग्रेसला विजय मिळवला. तर अहमदाबाद जिल्ह्य़ातील एल्सब्रिज, मणीनगर, साबरमती व साणंद या जागा भाजपने मोठय़ा मताधिक्याने राखल्या. बडोद्यात दहा पैकी ९ मतदारसंघात भाजपने यश मिळवले. एकूणच शहरी मतदारांनी भाजपला गुजरातमध्ये हात दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 3:03 am

Web Title: gujarat election result 2017 bjp won in gujarat city
Next Stories
1 मोदींना आव्हान देणाऱ्या तरुण नेतृत्वाचा गुजरातमध्ये विजय
2 हार्दिक पटेलच्या गावी भाजपचा पराभव
3 गुजरातमध्ये मोदींच्या गावातच भाजपचा पराभव
Just Now!
X