गुजरातमधील विरगमन येथील वासावा गावामधून अहमदाबाद पोलिसांनी एका गुंडाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. डाफर गँग नावाने स्थानिकांमध्ये दहशत असलेल्या गुंडाच्या गटातील अकबर उर्फ लूलो सिंधी (४५) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बालात्काराच्या दोन गुन्ह्यांमध्ये पोलिस या अकबरचा शोध घेत होते. धक्कादायक बाबमध्ये अकबर हा पिडीत महिलेच्या जोडीदारासमोरच त्यांच्यावर बलात्कार करायचा.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजदीपसिंह झाला यांनी या गँगमधील इतर तीन गुंडाचा शोध सध्या सुरु असल्याची माहिती दिली. “बालात्काराच्या दोन गुन्ह्यांमध्ये अकबरचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने एका मुलीचा तिच्या प्रियकरासमोर तर एका विवाहित महिलेचा तिच्या पतीसमोर बलात्कार केला,” अशी माहिती झाला यांनी दिली. ‘डाफर गँग’च्या सदस्यांवर चोरी, लूटमार आणि खूनाचेही गुन्हे दाखल आहेत. “चोरीच्या उद्देशाने घरफोडी करणाऱ्या डाफर गँगला घरामध्ये मैलवान्य वस्तू न सापडल्यास ते घरातील महिलेचा बलात्कार करायचे,” असंही पोलिसांनी सांगितलं. या गँगच्या विरोधात एकूण १८ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये चोरी, बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणे, पाकीटमारीसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. सानंद, सरखेज, बावला, कालोल, लंगहदाज, बागोदारा, महेसाणा, लख्तर, बाटोद, विरामगाम आणि खाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये चोऱ्या केल्या आहेत.

अकबरने केलेले दोन गुन्हे

१० ऑक्टोबर  रोजी नर्मदा कालव्याजवळून एक तरुणी आणि तिचा प्रियकर बाईकवरुन जात होते. त्यावेळी अखबर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्या दोघांना थांबवले. चाकूचा धाक दाखवून चोरांनी त्यांना सर्व दागिने देण्यास सांगितले. मात्र त्यांच्याकडे कोणतेचे दागिने नव्हते. त्यामुळे संतापलेल्या अकबर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुलीच्या ओढणीने तिच्या प्रियकराचे हात पाय बांढले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूच्या झाडीमध्ये मुलीला घेऊन गेले आणि तिथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तेथून मुलाचे हेल्मेट चोरुन पळ काढला. पोलिसांनी अकबरकडून हे हेल्मेट ताब्यात घेतले आहे.

३० ऑक्टोबर आचरसा गावामधील आपल्या शेतामध्ये एक दांपत्य झोपले होते. त्यावेळी रात्री साडेतीनच्या सुमारास अकबर आणि त्याचे काही सहकारी धारधार शस्र आणि लाठ्या घेऊन तेथे आले. त्यांनी त्या दोघांकडे दागिन्यांची मागणी केली. मात्र आपल्याकडे काहीच नसल्याचे त्यांनी चोरांना सांगितले. त्यानंतर चोरांनी पंचाने शेतकऱ्याचे हातपाय बांधले आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्यासमोरच त्याच्या ३० वर्षीय पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.