News Flash

Gujarat election results 2017: गुजरातमध्ये पुन्हा कमळच, काँग्रेसकडून कडवी झुंज

काँग्रेसने भाजपला काँटे की टक्कर दिल्याचे दिसून आले.

Gujarat election results 2017 Update: गुजरात आणि हिमाचल निवडणुकांमध्ये भाजपने सत्ता काबीज केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसने ७७ जागा पटकावल्या. हिमाचलमध्येही भाजपने काँग्रेसला पिछाडीवर टाकत विजय मिळवला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच गुजरातचे मॉडेल दाखवून देशात भाजपची सत्ता काबीज केली होती. सकाळच्या टप्प्यात कल हाती येऊ लागले तेव्हा काँग्रेसने भाजपला काँटे की टक्कर दिल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसला कमी लेखण्याची चूक यापुढे भाजपला करणे महागात पडू शकते हेच या निकालावरून दिसून आले.

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणूक निकालांच्या आधीच राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यांची यावेळी असलेली प्रचाराची शैली आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याची क्षमता वेगळी आहे हे जाणवले. मतपेटीतही त्याचा परिणाम दिसून आला असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका लढवल्या जातील त्यावेळीही राहुल गांधी यांनी अशाच प्रकारे टक्कर दिली तर ती निवडणूकही भाजपसाठी कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा गड राखत हिमाचलमध्येही यश मिळवले आहे. मात्र हे यश भाजपला अपेक्षित होते तसे नाही. कारण हिमाचलमध्ये ६० जागा तर गुजरातमध्ये १५० जागा मिळवण्याचा आत्मविश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला होता. भाजपच्या या विश्वासाला सुरुंग लावण्यात काँग्रेस काही प्रमाणात यशस्वी ठरली आहे.

राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रचारादरम्यान मोठा बदल घडलेला दिसून आला. तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या दिग्गज मंत्र्यांनी गुजरातमध्ये सभा घेऊन काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचाराचा धडाका लावला. विकासाचे राजकारण पुढे करत भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. तर नेमका विकास काय आणि कुठे झाला हे दाखवत राहुल गांधींनी भाजपला भंडावून सोडले. जनमताचा कौल जरी भाजपकडे गेला असला तरीही काँग्रेसनेही चांगली कामगिरी केली हे मान्य करावे लागेल.

 

Updates

काँग्रेस ७७ जागांवर विजयी

९९ जागांवर भाजपचा विजय

गुजरातमध्ये १०९ जागांवर भाजपची आघाडी

 

गुजरातमध्ये १०७ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये १०४ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये १०६ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये १०७ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये १०५ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ९९ जागांवर भाजपची आघाडी

 

गुजरातमध्ये ९८ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ९२ जागांवर भाजपची आघाडी

काँग्रेसची ७७ जागांवर आघाडी

गुजरातमध्ये ८२ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ५८ जागांवर काँग्रेसची आघाडी

गुजरातमध्ये ९० जागांवर भाजपची आघाडी

काँग्रेसची ५२ जागांवर आघाडी

गुजरातमध्ये ८४ जागांवर भाजपची आघाडी

काँग्रेसची ४४ जागांवर आघाडी

गुजरातमध्ये ६५ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ६३ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ५४ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ५३ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ४८ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ४४ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ३७ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ३५ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ३३ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये ३१ जागांवर भाजपची आघाडी

गुजरातमध्ये २४ जागांवर भाजपची आघाडी

काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती

गुजरातमध्ये भाजप २० जागी आघाडीवर

गुजरातमध्ये भाजप १५ जागी आघाडीवर काँग्रेस ४ जागी आघाडीवर

गुजरातमध्ये भाजप ८ जागी आघाडीवर तर काँग्रेस ३ जागी आघाडीवर

सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 7:53 am

Web Title: gujarat legislative assembly election result in 2017 political parties bjp gpp ind inc jdu ncp seats
Next Stories
1 Himachal Pradesh Elections results 2017: काँग्रेसचा पराभव, भाजपला स्पष्ट बहुमत
2 गुजरातचा कौल कुणाला?
3 ‘तोयबा, जमातचे दहशतवादी देशभक्तच’
Just Now!
X