News Flash

गुजरातमध्ये अचानक कोसळला पूल, मधोमध लटकल्या कार

पूलावरुन जाणाऱ्या तीन ते चार गाड्या नदीमध्ये वाहून जाण्यापासून अगदी थोडक्यात बचावल्या.

गुजरातमध्ये ४० वर्षे जूना व ६० फूट लांबीचा एक पूल पावसामुळे अचानक कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. जुनागड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हा पूल अगदी मधोमध खचला. यामध्ये जिवीतहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मात्र, पूलावरुन जाणाऱ्या तीन ते चार गाड्या नदीमध्ये वाहून जाण्यापासून अगदी थोडक्यात बचावल्या. काही गाड्या पुलावरच मधोमध लटकल्या होत्या.


रविवारी पूल तुटण्याची ही घटना घडली. सासन आणि गीर या भागाला जोडणारा हा पूल आहे. पूल कोसळल्यामुळे सासन आणि गीर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पूल कोसळल्याची माहिती समजताच परिसरातील लोकांनी एकच धाव घेत मदकार्य सुरू केलं. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जुनागडचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी यांनी दिली.

पाहा व्हिडिओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 2:44 pm

Web Title: gujarat many cars damaged after a bridge collapsed near malanka village in junagadh sas 89
Next Stories
1 हृदयद्रावक! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात धबधब्यावरुन पडून सहा हत्तींचा मृत्यू
2 अविवाहित परदेशी जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी, सौदी अरेबियाचा निर्णय
3 Video: मुंबईतील जंगलांबद्दलचे राज ठाकरेंचे ब्लू प्रिंटमधील भाषण व्हायरल
Just Now!
X