News Flash

धक्कादायक! रुग्णवाहिकेतून न आल्याने कोविड रुग्णालयाचा उपचारास नकार; महिला प्राध्यापकाचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने निधन

रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचारास दिलेल्या नकारामुळे एका महिला प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्राणी बॅनर्जी या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्सच्या प्रमुख होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने त्यांना योग्य रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झालं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी संधयाकाळी इंद्राणी बॅनर्जी यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. शुक्रवारी त्यांना गांधीनगर येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण यावेळी रुग्णालयात जागा शिल्लक नव्हती. यावेळी इंद्राणी बॅनर्जी यांनी सहकाऱ्यांना गांधीनगरमधील खासगी रुग्णालयात नेण्याची विनंती केली. खासगी रुग्णालयानेही आपल्याकडे व्हेंटिलेटर तसंच इतर सुविधा नसल्याचं सांगितलं.

यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांनी इंद्राणी बॅनर्जी यांना खासगी वाहनातून अहमदाबाद पालिकेच्या कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने EMRI 108 रुग्णवाहिकेतून आणलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. यानंतर त्यांना पुन्हा गांधीनगरमधील रुग्णालयात आणण्यात आलं. पण तोपर्यंत ऑक्सिजनची पातळी खूपच खालावली होती असं सहकाऱ्यांनी सांगितलं.

पहाटे २ वाजता जेव्हा रुग्णालयाने इंद्राणी बॅनर्जींसाठी BiPAP ऑक्सिजन मशीनची व्यवस्था केली तोपर्यंत उशीर झाला होता. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 10:30 am

Web Title: gujarat professor dies after covid hospital turns her away for not taking ambulance in gujarat sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Corona: भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद; ८७९ मृत्यू
2 रेमडेसिवीर ‘करोना’वर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही -WHO
3 करोना स्थितीवरुन सोनिया गांधींनी व्यक्त केली चिंता; मोदींना पत्र लिहित म्हणाल्या…
Just Now!
X