News Flash

दिल्लीहून गुजरातकडे जाणाऱ्या गाडीत सापडले कोट्यवधी; नोटा मोजण्यासाठी मागवाव्या लागल्या मशीन्स

दिवसभर सुरू होत नोटा मोजण्याचं काम; पोलिसही चक्रावले

गाडीतून जप्त करण्यात आलेले पैसे मोजताना पोलीस. (व्हिडीओतील दृश्य)

एका कारमध्ये इतके पैस सापडले की ते मोजण्यासाठी अख्खा दिवस लागला… तर तुमचा विश्वास बसेल? पण हे असं खरंच घडलं आहे. राजस्थानमध्ये एक कार पोलिसांनी जप्त केली आहे, ज्यात कोट्यवधी रुपये सापडले आहेत. कारमध्ये सापडलेले पैसे मोजण्यासाठी चक्क बँकेतून मशीन्स मागवाव्या लागल्या. राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी गुजरातकडे जाणारी एक कार जप्त केली. या कारमध्ये पोलिसांना कोट्यवधी रुपये सापडले आहेत. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून ही कार गुजरातकडे जात असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस सध्या दोघांची चौकशी करत आहेत.

डुंगपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलिसांनी कार रोखली. त्यानंतर झाडाझडती घेतली असता, त्यात मोठी रक्कम आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली. हे कोट्यवधी रुपये दिल्लीहून गुजरातला हवालाच्या मार्गे नेण्यात होते, अशी माहिती आता समोर येत आहे. पोलीस उपअधीक्षक मनोज सवारिया म्हणाले,”पैसे जप्त करण्यात आले आहेत आणि आरोपींची चौकशीही केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण हवालाशी संबंधित असल्याचं दिसून येत आहे. पोलीस सध्या तपास करत असून, आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे,” अशा माहिती सवारिया यांनी दिली.

कारची झाडाझडती घेतल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. कारमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा होत्या. कारमध्ये असलेल्या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना बँकेमधून मशीन्स मागवाव्या लागल्या. सकाळी सुरू झालेलं नोटा मोजण्याचं काम सायंकाळपर्यंत सुरू होतं. ज्या कारमधून ही रक्कम घेऊन जाण्यात येत होती. त्या गाडीचा क्रमांक ‘डीएल८ सीएएक्स३५७३’ असा आहे. या कारमध्ये तब्बल साडेचार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 12:20 pm

Web Title: gujarat rajasthan car seized with many crore cash dungarpur police action accused arrest bmh 90
Next Stories
1 Video : भररस्त्यावर तरुणाला कानशिलात लगावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा माफीनामा, पदही गमावलं!
2 दिलासादायक! करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट
3 “भाजपात प्रवेश करून चूक केली, दीदीशिवाय नाही राहू शकत”
Just Now!
X