पबजी या गेममुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे समोर येत असतानाच गुजरातमधील राजकोट शहरात पबजी गेमवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे.

‘प्लेयर्स अननोन बॅटलग्राऊंड’ अर्थात पबजी हा ऑनलाइन गेम पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या गेमने तरुणांसह शाळेतील विद्यार्थ्यांनाही अ राजकोट पोलिसांनी 6 मार्च रोजी पबजी गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. “पबजी खेळाक्षरश: वेड लावले आहे. या पार्श्वभूमीवरमुळे तरुणांमध्ये हिंसक वृत्ती वाढत आहे. याशिवाय या गेममुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होत आहे. सामाजिक सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पबजी गेमवर बंदी घालण्यात येत आहे”, असे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ आणि कलम ३७ (३) अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.

आता राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याचे स्वरुप पाहता संबंधित तरुणांची तातडीने जामिनावर सुटका होते. यानंतर कोर्टात हे प्रकरण जाते आणि तिथे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुनावणी होते, असे पोलिसांनी सांगितले.

बुधवारी पोलीस मुख्यालयाजवळच पबजी खेळणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. तिघांचीही जामिनावर सुटका देखील झाली आहे. तीन पैकी एक जण हा शहरातील खासगी कंपनीत काम करतो. तर दुसरा तरुण हा कामगार आहे. तर तिसऱ्या तरुणाचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रोहित रावल यांनी दिली.

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजकोट पोलिसांनी सहा ते 13 मार्च या कालावधीत एकूण 10 जणांना अटक केली आहे.
मंगळवारी देखील पोलिसांनी राजकोटमधील कलावड येथे महाविद्यालयाच्या बाहेरील चहाच्या टपरीवर पबजी गेम खेळणाऱ्या सहा जणांना अटक केली होती. संबंधितांचे मोबाईल फोन देखील जप्त केले आहे. मात्र, तपासासाठीच हे मोबाईल जप्त करण्यात येत आहेत. मोबाईलवर पबजी गेम सुरु होता का तसेच पबजी गेमची हिस्ट्री तपासण्याचे काम केले जाते, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले.