News Flash

गुजरात : भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू

दहा जण गंभीर जखमी, ट्रक व रिक्षाची समोरासमोर धडक

गुजरातमध्ये आज ट्रक आणि ऑटो रिक्षा यांच्या घडलेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांना कळवल्या जात आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की या ऑटो रिक्षाचा पुर्णपणे चुराडा झाला. हा अपघात कच्छजवळील मनकुआ भागात झाला. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 4:18 pm

Web Title: gujarat seven people die and 10 injured in accident msr 87
Next Stories
1 तीन वर्षांपुर्वी बेपत्ता झालेल्या मुलीच्या नावे खंडणीचा फोन, पोलीसही हैराण
2 कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा गुरूवारी समारोप?
3 …तर भारतावर मराठ्यांनीच राज्य केलं असतं-शशी थरुर
Just Now!
X