27 October 2020

News Flash

गुजरातः बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तीन कामगारांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

मध्यरात्री अचानक कोसळली इमारत

गुजरातमधील बडोदे येथे काम सुरू असलेली तीन मजली इमारत मध्यरात्री कोसळल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील बडोद्यातील बावानानपूरा येथील मध्यरात्रीच्या सुमारास काम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली. माध्यमांनी दिलेल्या माहिनुसार स्थानिकांनी सांगितलं की, “सर्वप्रथम ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.” दरम्यान, सोमवारी रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाताच बचावकार्यासाठी सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या. तसंच सध्या या इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिनाभरापूर्वीही अहमदाबादमध्ये एक व्यावसायिक इमारत कोसळली होती. त्यामध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 7:31 am

Web Title: gujarat three persons died after an under construction building collapsed in bawamanpura in vadodara late last night jud 87
Next Stories
1 ट्रॅम्प यांच्याकडून दोन वर्षांत केवळ ७५० डॉलर प्राप्तिकर भरणा
2 धोरणातील बदलामुळे ‘राफेल’ला ऑफसेट भागीदार जाहीर न करण्याची मुभा
3 संरक्षण सामग्री खरेदीतील ‘ऑफसेट’ धोरण रद्द
Just Now!
X