05 July 2020

News Flash

Coronavirus : अहमदाबादमध्ये रक्तद्रव उपचार चाचण्या सुरू

अहमदाबादमध्ये रुग्णांची संख्या १००२ झाली असून त्यात शहरातील ९७८ रुग्ण आहेत.

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ात करोनाच्या चाचण्या जास्त प्रमाणात होत असल्याने तेथे करोना रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहेत.  शहरातील काही रुग्णालयांतून रक्तद्रव उपचार चाचण्या रविवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.

अहमदाबादमध्ये रुग्णांची संख्या १००२ झाली असून त्यात शहरातील ९७८ रुग्ण आहेत. बाकीचे जिल्ह्य़ाच्या परिसरातील आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी दिली. आता दिल्ली व मुंबईपेक्षा अहमदाबादमधील रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे.  एकूण १४,००० नमुने तपासण्यात आले असून शहराची लोकसंख्या ८० लाख आहे. हॉटस्पॉट भागातील लोकांचे नमुने यात तपासण्यात आले आहेत. लाखात २४९० निदान चाचण्या करण्यात आल्या असून दिल्लीत हे प्रमाणात लाखात ११०३ आहे. आम्ही स्वत:हून विविध  भागात चाचण्या करण्यास सुरुवात केल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. असे नेहरा म्हणाले.

त्यांनी सांगितले की, संकुल भागात जाऊन चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होत आहे. ९७८ पैकी सत्तर टक्के रुग्ण हे आम्ही केलेल्या पाहणीमुळे दिसून आले आहेत, अन्यथा ते सापडले नसते. ‘हॉटस्पॉट’  भागातील नव्वद टक्के नमुने घेण्यात आले असून रुग्णांची संख्या कमी होईल.

दरम्यान शहरातील पहिली रुग्ण असेलली महिला बरी होऊन एसव्हीपी रुग्णालयातून रविवारी घरी गेली. तिला १७ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

गुजरातमध्ये आणखी पाच बळी

अहमदाबाद : गुजरातमध्ये तीन महिलांसह आणखी पाच जण करोनाने मरण पावले असून आता राज्यातील मृतांची संख्या ५८ झाली आहे. पाच मृत्यूंपैकी चार हे अहमदाबादचे असून एक जणाचा सुरतमध्ये मृत्यू झाला. पाच पैकी चार जणांना सहआजार (को मॉर्बिडिटी) होते. त्यात मधुमेह, मूत्रपिंड विकार, अतिरक्तदाब यांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य सचिव जयंती रवी यांनी दिली आहे. अहमदाबादेतील मृतांमध्ये ४३ वर्षांची महिला व ७८ वर्षांचा पुरुष यांचा समावेश होता. त्यांना अनुक्रमे मधुमेह व मूत्रपिंड आजार होते. अतिरक्तदाब असलेली ५७ वर्षांची महिला मृत्युमुखी पडली. ६६ वर्षांच्या महिलेचाही अहमदाबादेत बळी गेला असून तिला इतर आजार नव्हते. सुरत मध्ये ५६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला असून तिला अतिरक्तदाबाचा विकार होता.

अहमदाबाद महापालिकेने आता रक्तद्रव उपचार चाचण्या सुरू केल्या असून त्यासाठी इच्छुक दात्यांकडून कालच रक्त द्रव घेण्यात आला होता. आम्ही या उपचार पद्धतीचा प्रस्ताव भारतीय वैद्यक परिषदेकडे मांडला होता. तो मंजूर करण्यात आला आहे.

– विजय नेहरा, महापालिका आयुक्त, अहमदाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2020 2:38 am

Web Title: gujarat to start clinical trial with convalescent plasma therapy for covid 19 patients zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 रेल्वे, विमानसेवेबाबत अद्याप निर्णय नाही
2 Coronavirus : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हायड्रॉक्सी क्लोरोक्विन घ्या!
3 दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले
Just Now!
X