21 November 2019

News Flash

वायूची वादळ’वाट’ बदलली; परंतु गुजरात किनारपट्टीवरील धोका कायम

गुजरातवरील धोका काहीसा कमी झाला असला तरी पूर्णत: संपला नाही.

‘वायू’ चक्रीवादळामुळे गुजरातवर निर्माण झालेला धोका काहीशा प्रमाणात कमी झाला आहे. 150 किलोमीटर प्रति तास वेगाळे गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी जवळून जाणार आहे. त्यामुळे गुजरातवरील धोका काहीसा कमी झाला असला तरी पूर्णत: संपला नाही. हे चक्रीवादळ वेरावळ, पोरबंदर आणि द्वारकाजवळून जाणार असून या भागांमध्ये जोरदार पावसाची शत्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यादरम्यान आपात्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या 52 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नौदल, हवाई दल आणि सैन्यदलासहित तटरक्षक दलालालही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आहेत.

वायू चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या काही भागांमध्ये धडकण्याची अपेक्षा असताना त्याच्या परिणामांना तोंड देण्याची प्रशासनाने तयारी केली होती. सागरी किनाऱ्यावरील सुमारे लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून या भागांतील बंदरे आणि विमानतळांवरील परिचालन स्थगित करण्यात आले आहे.

दरम्यान, वादळाने आपली दिशा बदलली असली तरी गुजरातवरील धोका कायम आहे. याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरील जिल्ह्य़ांमध्ये मदत व बचाव कार्यासाठी लष्कर, हवाई दल आणि एनडीआरएफ यांची पथके तैनात करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार त्यांची मदत घेतली जाणार आहे. चक्रीवादळ येऊन धडकल्यानंतर शोध व बचावकार्यासाठी तटरक्षक दलानेही जहाजे आणि विमाने तैनात केली आहेत. प्रत्येकी सुमारे ७० जणांचा समावेश असलेल्या लष्कराच्या तुकडय़ा जामनगर, गीर, द्वारका, पोरबंदर, सोमनाथ, मोरवी, भावनगर, राजकोट व अमरेली येथे नेमण्यात आल्या असून, आणखी  राखीव तुकडय़ा तयार ठेवण्यात आल्या आहेत.

First Published on June 13, 2019 10:56 am

Web Title: gujarat vayu cyclone changes direction risk continues will hit coast jud 87
Just Now!
X