राष्ट्रीय महामार्ग आठ वरील हॉटेलच्या वॉशरुममध्ये एक महिला बाळंत झाली. 108 क्रमांकावरुन रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मदतीने या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. कांकू राठवा असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. कांकू बुधवारी सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसमधून पती मितेश राठवा सोबत पंचमहाल जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी निघाली होती.
NH-8 वर पालेज येथे बस थांबलेली असताना, कांकू एका हॉटेलच्या वॉशरुममध्ये गेली होती. तिला आधीपासून वेदना सुरु होत्या. या तीव्र वेदनांमुळे कांकू अचानक खाली कोसळली. राष्ट्रीय महामार्गावर हे हॉटेल अशा ठिकाणी आहे, जिथून कुठलेही रुग्णालय नजीक नाहीय. या महिलेची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर हॉटेल मालकाने लगेच १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला.
या रुग्णवाहिकेतील इमर्जन्सीमध्ये वैद्यकीय मदत करणाऱ्या टीमच्या मदतीने हॉटेलच्या वॉशरुममध्ये महिलेची प्रसूती झाली. या महिलेला तीव्र प्रसुती कळा सुरु होत्या. त्यामुळे ती वॉशरुममध्ये कोसळली. “आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा महिला विव्हळत होती. आम्ही तिची मदत करु शकलो, यात आनंद आहे” असे मेडिकल टीममध्ये धर्मेश गांधी यांने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 5:00 pm