तुझा रंग काळा आहे, तुझे दात मोठे आहेत असे सांगत सासरच्या मंडळीनी एका ३२ वर्षीय महिलेचा छळ सुरू हुंड्यासाठी छळ सुरू केला. या महिलेने या जाचाला कंटाळून पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सुनेच्या घरातल्यांनी मागितलेल्या हुंड्याची रक्कम दिली नाही म्हणून तिला सासरच्यांकडून टोमणेही ऐकावे लागत.

आणंद या ठिकाणी राहणाऱ्या या महिलेचा विवाह गेल्या वर्षी अहमदाबाद येथील एका पुरुषाशी झाला. सुरूवातीचे १५ दिवस माझे सासरचे लोक माझ्याशी बरे वागले. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांनी माझ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. अनेकदा मला उपाशी ठेवण्यात येत असे त्यावर विचारले की तुझ्या वडिलांनी आम्हाला हुंड्याची पूर्ण रक्कम दिलेली नाही म्हणून आम्ही तुम्हाला उपाशी ठेवतो आहोत असेही सांगण्यात येत असल्याचेही महिलेने म्हटले आहे.

माझी सासू मला कायम टोमणे मारत असे, तू गरीब कुटुंबातली आहेस, तुझा रंग काळा आहे तुझे दात मोठे आहेत असे टोमणे मला लगावले जायचे. माझ्या कपडे घालण्याच्या पद्धतीवरूनही मला नावे ठेवली जात.  पोलिसांनी या प्रकरणी कलम ४९८ ए , २९४ बी आणि कलम ११४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.