23 February 2018

News Flash

Gujarat Assembly Election : जाहिरातीतून ‘पप्पू’ शब्द वगळा; निवडणूक आयोगाचे भाजपला आदेश

भाजपकडून या नावाचा अपमानजनक वापर होत असल्याचा आयोगाचा आक्षेप

गुजरात | Updated: November 15, 2017 10:48 AM

Gujrat Assembly Election 2017: प्रचाराचा विचार केल्यास भाजपने आतातरी आघाडी घेतल्याचं दिसतंय. एक बूथ दहा युथ, शक्तिकेंद्र, पेजप्रमुख या माध्यमातून शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची रणनीती पक्षानं आखलीये.

निवडणूक आयोगाने भाजपला Gujarat Assembly Election गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘पप्पू’ नावाचा वापर करण्यास आक्षेप नोंदवला आहे. गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबर रोजी मतदान तर दि. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेस दरम्यान आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने भाजपला एक पत्र पाठवून निवडणूक प्रचाराशी निगडीत वाहिन्यांवरील जाहिराती, होर्डिंग, पोस्टर आणि बॅनर आदिंवर ‘पप्पू’ नावाचा वापर करण्यावर आक्षेप नोंदवला आहे. भाजपने आपल्या प्रचार साहित्यावरून पप्पू नाव हटवण्यास सांगितले आहे. गुजरात निवडणूक आयोगानुसार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधणे मर्यादेचे उल्लंघन केल्यासारखे आहे. निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार साहित्याचे परीक्षण केल्यानंतर म्हटले की, यामध्ये एका खास व्यक्तिमत्वाकडे इशारा करत ‘पप्पू’ शब्दाचा अपमानजनक वापर केला जात आहे.

भाजपने गुजरात निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या प्रचार साहित्यात कोणा एका व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आयोगाचा हा आदेश योग्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे. गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभा जागा आहेत. बहुमतासाठी ९२ जागांची आवश्यकता आहे. राज्यात मागील दोन दशकांपासून भाजपचे सरकार सत्तेवर आहे. राज्यात मागील तीन विधानसभा निवडणुका (वर्ष २००२, २००७ आणि २०१२) भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या. तिन्ही वेळेस भाजपचे सरकार बहुमतात आले होते. वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत.

नुकताच पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणांमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पटेल एका हॉटेलमध्ये जाणारी सीडी माध्यमांत जारी करण्यात होती. या सीडीत हार्दिक राहुल गांधी यांना भेटण्यास गेला होता. तर आयबी आणि गुजरात पोलीस काँग्रेस नेते उतरलेल्या सर्व हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केला होता. परंतु, भाजपने सर्व आरोप फेटाळले आहेत.

First Published on November 15, 2017 10:24 am

Web Title: gujrat assembly election 2017 election commission pappu bjp congress rahul gandhi
 1. R
  raj
  Nov 16, 2017 at 3:53 pm
  भारतीय संस्कृती विसरलेल्या भाजपाला त्यांची जागा दाखवल्या बद्धल निवडणूक आयोगाचे धन्यवाद भारतीय संस्कृती मधेच लहान / मोठ्यांचा मान राखला जातो , प्रत्येकाला आदराने संबोधले जाते. मात्र सत्तेच्या गर्मीत वावरणाऱ्या भाजपाला मात्र याचा विसरपडलेला दिसतो.
  Reply
  1. उर्मिला.अशोक.शहा
   Nov 16, 2017 at 6:33 am
   वंदे मातरम- आयोगाने पप्पू ऐवजी युवराज हा शब्द वापरण्याची मुभा दिली आहे. वास्तविक युवराज हा शब्द काँग्रेसला अधिक घातक आहे कारण युवराज म्हणजे वंशवादाचे प्रतीक असल्या सारखा भास निर्माण होतो आहे. काँग्रेस मध्ये इलेक्शन रेस मध्ये पाळणारे घोडे हे लंगडे असल्या सारखे वाटते. त्यांच्या प्रचारात सुसूत्रता नाही. मोदी टीका एव्हडा एकाच अजेंडा असल्या सारखे वाटते इलेक्शन कमिशन च्या या आडवायझरी मुले उलट भाजप ला प्रचार करण्याची संधी च मिळाली आहे. या पूर्वी नरेंद्र मोदी बद्दल अत्यंत अर्वाच्य शब्दात याच काँग्रेसवाल्यानी टीका केली आहे त्या वेळी भाजप ने कोणतीही तक्रार केली नव्हती आणि आता पप्पू या संबोधनाने वाईट का वाटावे? गुजरात मध्ये कुटुंबातील पहिला मुलाला लाडाने पप्पू म्हणून संबोधण्यात येते. जा ग ते र हो
   Reply
   1. V
    vijay
    Nov 15, 2017 at 1:29 pm
    इथून पुढे मी माझ्या घरातील कुणाही लहान मुलाचा अपमान न करणार नाही.त्यालासुद्धा कोणी 'प' म्हणता कामा नये.
    Reply
    1. S
     Swapnil
     Nov 15, 2017 at 1:02 pm
     म्हणजे नावावर शिक्कामोर्तब झाले म्हणायचे
     Reply
     1. S
      Shriram
      Nov 15, 2017 at 12:24 pm
      लोकसत्ताने सुध्दा प.. म्हणणे सोडून द्यावे.
      Reply
      1. R
       RAMAN
       Nov 15, 2017 at 11:55 am
       काँग्रेसने ह्या शब्दाचा वापर करावा
       Reply
       1. D
        Darshan
        Nov 15, 2017 at 11:52 am
        जगते राहो , तात्या बापट आदी भक्त मंडळ सगळे गायब ?
        Reply
        1. C
         cc
         Nov 15, 2017 at 11:13 am
         If they use pappu then they will use feku
         Reply
         1. Load More Comments