News Flash

Yes Bank crisis : निर्बंधाच्या एक दिवस आधी गुजरातच्या कंपनीनं काढले २६५ कोटी

निर्बंध घालण्यापूर्वी त्यांनी रक्कम दुसऱ्या बँकेत वळती केली.

Yes Bank crisis : निर्बंधाच्या एक दिवस आधी गुजरातच्या कंपनीनं काढले २६५ कोटी
संग्रहित छायाचित्र

रिझर्व्ह बँकेने गुरूवारी येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार ग्राहकांना बँकेतून ५० हजार रूपयांची रक्कम काढता येणार आहे. परंतु रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच गुजरातच्या वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट या कंपनीनं २६५ कोटी रूपयांची रक्कम वळती केली आहे. दरम्यान, या कंपनीनं ही संपूर्ण रक्कम दुसऱ्या बँकेत वळती केली आहे.

“स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम केंद्र सरकारकडून मिळाली होती. ती रक्कम स्थानिक येस बँकेच्या शाखेत जमा करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच येस बँकेच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली आणि बँक ऑफ बडोदाच्या शाखेत ही रक्कम वळती केली,” अशी माहिती बडोदा महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) सुधीर पटेल यांनी दिली.

कर्जवाटपाबाबतच शंका
अमुक क्षेत्राला कर्ज दिले म्हणून नव्हे तर एकूणच कर्ज वितरणाच्या धोरणाबाबत शंका घेण्यासारखी स्थिती असल्याचे खासगी बँकेत हिस्सा खरेदी करू पाहणाऱ्या स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिल्लीत अर्थमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर येस बँकेची स्थिती निर्बंध कालावधीपर्यंत पूर्वपदावर येईल, असा दावा केला. आर्थिक स्थैर्यासह ठोस आराखडय़ासह ही बँक पुन्हा सक्षम होईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील १०९ बँकांना फटका
रिझव्‍‌र्ह बँकेने ‘येस’ बँकेवर निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील १०९ बँका अडचणीत आल्या असून त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह काही नागरी बँका व काही पत संस्थांचाही समावेश आहे. या बँकांचे सर्व ‘ऑनलाईन’ व्यवहार ठप्प झाले होते. व्यापाऱ्यांनी येस बँकेशी संबंधित धनादेशही स्वीकारण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 10:10 am

Web Title: gujrat company vadodara smart city transfers money in bank of baroda yes bank crisis jud 87
Next Stories
1 Yes Bank crisis : संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा
2 ‘सामाजिक तेढ, मंदी, साथीचे रोग यांपासून भारताला धोका’
3 इराणमधील तीनशे भारतीयांचे नमुने तपासणीसाठी आणणार
Just Now!
X