News Flash

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं ९२ व्या वर्षी निधन

काही दिवसांपूर्वी झाली होती करोनाची लागण

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं आज ९२ व्या वर्षी निधन झालं. सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु उपचारानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी केशुभाई पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.

केशुभाई पटेल यांच्या मुलानं दिलेल्या माहितीनुसार करोनावर मात केल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली होती. परंतु गुरूवारी सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. दरम्यान, त्यांना त्यानंतर त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु त्यांनी उपचाराला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

दोन वेळा भूषवलं मुख्यमंत्रीपद

केशुभाई पटेल यांनी दोन वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. १९९५ आणि १९९८ मध्ये ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. परंतु २००१ मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दोन्ही वेळा त्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. याव्यतिरिक्त त्यांनी गुजरातचं उपमुख्यमंत्रीपदही भूषवलं होतं. २००१ मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती.

२४ जुलै १९२८ मध्ये जुनागढ येथे केशुभाई पटेल यांचा जन्म झाला होता. त्यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतक जनसंघ आणि भाजपासोबत ते मोठ्या काळासाठी जोडले गेले होते. केशुभाई पटेल हे दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जात होते. राज्यात भाजपाकडून पहिले मुख्यमंत्रीही तेच होते. काही कारणास्तव २०१२ मध्ये केशुभाई पटेल यांनी आपल्या गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना केली होती. परंतु दोन वर्षांतच त्यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलिन केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 12:42 pm

Web Title: gujrat former cm keshubhai patel passes awat at the age of 92 jud 87
Next Stories
1 धक्कादायक! रस्त्यावर थुंकण्यावरुन हटकल्याने भारतीयाने केली रग्बीपटूची हत्या
2 फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे भारताकडून समर्थन, मुस्लिम देशांमध्ये फ्रान्स विरोधात संतापाची भावना
3 छत्तीसगड सरकारनं माफ केला टाटा प्रोजेक्टचा २०० कोटी रुपयांचा दंड
Just Now!
X