यूएस कम्युनिटी कॉलेज येथे करण्यात आलेल्या गोळीबारात ९ ठार व २० जण जखमी झाले नंतर मारेकऱ्याने स्वतवरही गोळी झाडून घेतली. या घटनेमुळे पुन्हा एकदा अध्यक्ष ओबामा यांनी बंदूक नियंत्रण कायद्याची गरज व्यक्त केली आहे. ख्रिस हार्पर मर्सर या २६ वर्षांच्या तरूणाने हा गोळीबार केला व त्याने ख्रिश्चनांना लक्ष्य केले आहे. रोसेबर्ग येथे उम्पाक्वा कम्युनिटी कॉलेज येथे ही घटना ओरेगॉन राज्यात घडली. हा बंदुकधारी वर्गामध्ये गेला व गोळीबार केला. या महाविद्यालयात तीन हजार विद्यार्थी आहेत. गोळीबाराच उद्देश समजू शकला नाही. अध्यक्ष ओबामा यांना आतापर्यंत बंदूक नियंत्रण कायदा करण्यासाठी अमेरिकी काँग्रेसचे मन वळवता आलेले नाही. आपले विचार आणि प्रार्थना पुरेशा नाहीत असे

हताश उद्गार त्यांनी काढले. नुसते दुख व्यक्त करून अमेरिकेतील रक्तपात थांबणार नाहीत.उदया दुसरीकडे, महिनाभराने तिसरीकडे हे सुरूच राहील असे त्यांनी व्हाईट हाऊस येथे सांगितले.

गेल्या सात वर्षांत असे अनेक हल्ले झाले असून प्रत्येक वेळी ओबामा यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ही नेहमीची गोष्ट झाली आहे, त्याच्या बातम्या नेहमीच्याच बनल्या आहेत, आपण प्रत्येकवेळी काही सांगतो आणि ते लोक विसरून जातात, आता आपण संवेदनाहीन बनलो आहोत. आता अशा हल्ल्यांची हद्द झाली, असे ओबामा म्हणाले. डग्लस परगण्याचे नगरपाल जॉन हॅनलीन हताश दिसत होते ते म्हणाले की, हा भयानक दिवस होता, समाजाला हा धक्का आहे.