केनियाच्या किनारपट्टीनजीक अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या आणखी एका हल्ल्यात सुमारे ११ जण ठार झाल्याची माहिती मंगळवारी सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. आठवडाभरापूर्वी याच भागात झालेल्या दुहेरी सामूहिक हत्याकांडात ६० जण ठार झाले होते. सोमालियाच्या अल कायदा संघटनेशी संबंधित असलेल्या ‘शेबाब’ या दहशतवादी संघटनेने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली होती.
नव्या हत्याकांडात काहींवर चाकूने वार करण्यात आले आहेत, तर काहींवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असून काहींची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. गेल्या हत्याकांडातही लोकांना अशाच पद्धतीने मारण्यात आले होते.
विटू शहरानजीक असलेल्या एका छोटय़ा गावात मध्यरात्री हे हत्याकांड घडले.
या महिन्यातील ही तिसरी दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया लामूचे आयुक्त स्टीफन इकुआ यांनी व्यक्त केली. प्रथम पाच मृतदेह सापडले. त्यानंतर आणखी सहा मृतदेह मिळाल्यानंतर हा प्रकार गंभीर असल्याचे आमच्या पथकाच्या लक्षात आल्याचे इकुआ यांनी स्पष्ट केले. या घटनेत जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 12:45 pm