पीटसबर्गपासून जवळ असलेल्या विल्कीन्सबर्गमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून, तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकी प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री हा हल्ला करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
पीटसबर्ग शहरापासून सुमारे १३ किलोमीटरवर असलेल्या विल्कीन्सबर्ग हा निवासी भाग आहे. तेथेच दोन बंदुकधाऱ्यांनी हा हल्ला केला. हल्ल्यामध्ये चार महिला आणि एक पुरुष मृत्युमुखी पडले. मी घटनास्थळी बंदुकीच्या २० फेऱ्या झडल्याचे ऐकले, असे केला अॅलेक्झांड्रा नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. त्यांचा शोध घेण्यात येतो आहे. तिन्ही जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2016 1:41 pm