News Flash

VIDEO: भटक्या कुत्र्यांना खाऊ घातल्याने सोसायटीने कुटुंबाला ठेवलं ओलीस; पोलिसांना करावी लागली मध्यस्थी

कुटुंबाला कारमध्येच कोंडून ठेवलं होतं

कुत्र्यांना खाऊ देणाऱ्या कुटुंबाला ओलीस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. कुटुंबाविरोधात आंदोलन करण्यासाठी इमारतीमधील रहिवासी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. भटक्या कुत्र्यांनी इमारतीमधील अनेक लहान मुलांचा चावा घेतला असून त्यांच्यामुळे नेहमी त्रास होत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. यामुळेच कुटुंबाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी सर्व एकत्र आले होते. गुडगावमध्ये ही घटना घडली आहे.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये रहिवासी कुटुंबाच्या घराबाहेर एकत्र आले असून घोषणा देत असल्याचं दिसत आहे. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. सेक्टर ८३ मधील जी-२१ अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये हा सगळा प्रकार घडला.

आणखी वाचा- धक्कादायक! मुलीची छेड काढणाऱ्यांची तक्रार केली म्हणून पित्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, रहिवाशांनी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या कुटुंबाला ओलीस ठेवलं होतं आणि कारमधून बाहेर येऊ देत नव्हते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 11:54 am

Web Title: gurgaon family held hostage for feeding strays sgy 87
Next Stories
1 इंडिगोच्या विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग, तरीही नाही वाचला प्रवाशाचा जीव
2 “तरुणांसमोर मोठं आयुष्य आहे, त्यांना आधी लस द्या”; मल्लिकार्जून खर्गेंची मागणी
3 १३ महिन्यांच्या तुरुंगावासादरम्यान त्या कैद्याने बनवलं सॉफ्टवेअर; सर्वोच्च न्यायालयानेही केलं कौतुक
Just Now!
X