News Flash

…अन् मुलांसमोरच पत्नीने किचनमधून चाकू आणून केली पतीची हत्या

पतीच्या मृत्यूनंतर अपघात असल्याचा पत्नीचा दावा; पोलिसांकडून चौकशी सुरु

Gurgaon Crime, Murder,
पतीच्या मृत्यूनंतर अपघात असल्याचा पत्नीचा दावा; पोलिसांकडून चौकशी सुरु

पत्नीनेच आपल्या ३९ वर्षीय इंजिनिअर पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने पतीची हत्या केली तेव्हा दोन्ही मुलं घरातच होती. आपल्या डोळ्यांसमोर वडिलांची हत्या झाल्याने मुलं खूप घाबरली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान हा अपघात आहे असं दावा करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांपत्यामध्ये घरगुती भांडण होतं, यामधूनच सचिन कुमारचा मृत्यू झाला. सचिन कुमारच्या छातीवर चाकूने वार झाले आहेत. “ज्योती पार्क कॉलनीत ही घटना घडली. घरगुती कारणावरुन झालेल्या भांडणामध्ये पत्नीने पतीवर चाकूने वार केले ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आम्ही संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे,” अशी माहिती गुरुग्रामचे पोलीस अधीक्षक प्रीतपाल सिंग यांनी दिली आहे.

सचिन कुमारच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सचिन कुमारच्या बहिणी रेशमा आणि शिपली यांनी आरोपी गुंजनला अटक करुन न्याय दिला जावा अशी मागणी केली आहे. “११ वर्षांची त्यांची मुलगी घाबरली असून तिच्या आईने शिकवलं आहे तसंच बोलत आहे. वडिलांना नकळतपणे चाकू लागला असं ती सांगत आहे. पण तिच्या वडिलांना चाकूने भोसकण्यात आलं आहे,” असं रेशमा यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी सांगितलं आहे त्यानुसार, “सचिन कुमार यांनी पत्नीच्या हातातून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता ते जखमी झाले. त्याच्या भावाने रुग्णालयात नेलं होतं पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला”. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 9:15 am

Web Title: gurgaon techie stabbed to death by wife in gurgaon sgy 87
Next Stories
1 मुदसीर पंडितसह ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराची मोठी कारवाई
2 राम मंदिर जमीन भ्रष्टाचार : ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली, त्यांचीच नियत ढळली -स्वामी दिलीप दास
3 योगाने लोकांमध्ये करोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – नरेंद्र मोदी
Just Now!
X