News Flash

डेरा प्रमुख राम रहीमला मिळणार ४२ दिवसांचा पॅरोल

सुनारिया येथील शेतीच्या कामांसाठी केला होता पॅरोलचा अर्ज

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांना ४२ दिवसांसाठी पॅरोल मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता त्यांचे तुरूगांबाहेर येणे जवळपास निश्चित आहे. राम रहीम यांच्यावतीने ४२ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर तरूंग अधिक्षकांकडून जिल्हा प्रशासनास पत्र देखील पाठवण्यात आले आहे.

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया येथील शेतीच्या कामांसाठी पॅरोलची मागणी केल्यानंतर डेरा सच्चा सौदा संप्रदाय प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांना ४२ दिवसांचा पॅरोल देण्यात येणार असल्याची चिन्ह आहेत. १८ जून रोजी यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्रात गुरमीत यांची तरूंगातील वर्तवणुक ठीक असल्याचे तसेच त्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन देखील केले नसल्याचे सांगण्यात आले होते.

याप्रकरणी हरियाणाचे मंत्री कृष्ण लाल पंवार यांनी याबाबत सांगितले की, कोणत्याही कैद्यास दोन वर्षांनंतर पॅरोलचा अधिकार आहे. गुरमीत राम रहीम यांनी यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार तरूंग अधिक्षकांनी जिल्हा प्रशासनास पत्र पाठवून उत्तर मागवले आहे. आता यावर निर्णय घेण्याचे काम जिल्हा प्रशासन व पोलिसांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 5:51 pm

Web Title: gurmeet ram rahim singh granted parole of 42 days msr87
Next Stories
1 ‘मोदीजी नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला आमचा जुना भारत द्या’
2 पश्चिम बंगाल : कांकिनारा परिसरातून ५० बॉम्ब जप्त
3 ‘विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशा ‘राष्ट्रीय मिशा’ जाहीर करा’, काँग्रेसची लोकसभेत मागणी
Just Now!
X