08 August 2020

News Flash

स्मृती इराणींवरील आक्षेपार्ह टीकेबद्दल गुरूदास कामतांना नोटीस

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

| August 1, 2015 04:51 am

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसीत गुरूदास कामत यांना या इराणींवरील आक्षेपार्ह टीकेविषयी आठवडाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरूदास कामत यांनी गुरूवारी राजस्थानधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांच्या पात्रतेविषयी शंका उपस्थित केली होती. यावेळी त्यांच्यावर टीका करताना कामत यांनी इराणींचा उल्लेख ‘पोचा लगानेवाली’ (साफसफाई करणारी) असा केला होता. कामत यांच्या याच विधानावर आक्षेप घेत राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठविल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी दिली. दरम्यान, कामत यांनी या सगळ्याला प्रत्युत्तर देताना, मी मुंबईत राहत असल्याने फार पूर्वी स्मृती इराणी यांना टेबल साफ करताना पाहिल्याचे म्हटले आहे. तेव्हा इराणी यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्या वर्सोवा येथील एका हॉटेलमध्ये काम करत असत. मी त्याठिकाणी अनेकदा त्यांना टेबल साफ करताना पाहिल्याचे कामत यांनी सांगितले. याशिवाय, एका अशिक्षित महिलेकडे शिक्षण खात्याचा कारभार सोपविल्याने सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरू असल्याचेही कामत यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2015 4:51 am

Web Title: gurudas kamat gets ncw notice for offensive remarks against smriti irani
Next Stories
1 याकूबच्या पत्नीला खासदार बनविण्याची मागणी करणाऱ्या घोसींची पक्षातून हकालपट्टी
2 दिवंगत माजी राष्ट्रपती कलाम यांची अनेक पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर
3 सरकारकडून याकूबचा कायदेशीर खून छोटा शकीलचा फुत्कार
Just Now!
X