News Flash

रंगाचा बेरंग! विद्यार्थिनीवर शेंदूर टाकल्याने आठवीतील मुलाला अटक

१४ वर्षांच्या मुलाला हा सण चांगलाच महागात पडला आहे. व

प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरात सध्या धुळवडीची जय्यत तयारी सुरु असून उत्तर भारतातील काही शहरांमध्ये बच्चेकंपनी आत्तापासूनच धुळवड साजरी करत आहे. मात्र गुरुग्राममधील १४ वर्षांच्या मुलाला हा सण चांगलाच महागात पडला आहे. वर्गातील एका विद्यार्थिनीवर शेंदूर टाकल्याचा आरोप त्याच्यावर असून पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतले आहे.

गुरुग्राम येथील फारुखनगर येथे राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाने सोमवारी त्याच्या वर्गातील एका मुलीच्या डोक्यावर शेंदूर टाकले. ते दोघेही शाळेतून परतत असताना हा प्रकार घडला. घरी परतल्यावर मुलीने तिच्या पालकांना या बाबत माहिती दिली. ‘मुलाने जाणूनबुजून माझ्या डोक्यावर शेंदूर टाकले’ असा तिचा आरोप होता. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत मुलाविरोधात तक्रार दाखल केली.
मुलीच्या आजोबांनी ‘मेल टुडे’शी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली. ‘मुलाने तिच्या डोक्यावर गुलाल नव्हे तर शेंदूर टाकले’ असा दावा त्यांनी केला. हिंदू धर्मात महिलांमध्ये शेंदूरला विशेष महत्त्व आहे. यातूनच हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे समजते.

मुलाच्या कुटुंबीयांना या प्रकरणाने मानसिक धक्काच बसला आहे. पोलिसांच्या कारवाईवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्या वयातल्या मुलांमध्ये धुळवडीची उत्सुकता असते. त्याने मुलीवर रंग टाकला. त्याने तिच्या डोक्यावर गुलाल टाकला होता. यामागे त्याचा वाईट हेतू नव्हता, असे मुलाच्या आईने सांगितले. इतक्या लहान मुलाला शेंदूरचे महत्त्व माहित नाही, असेही त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी मुलाविरोधात पॉस्को अंतर्गत कारवाई केली. अशा कठोर कायद्याअंतर्गत कारवाई केल्याने माझ्या मुलाचे आय़ुष्य उद्ध्वस्त होईल, अशी भीतीही त्याच्या आईने व्यक्त केली. सध्या मुलाची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 10:14 am

Web Title: gurugram 14 year old boy forcibly poured sindur on classmate booked under posco act by police holi prank
Next Stories
1 बालशोषणाचे ‘व्हॉट्सअ‍ॅप रॅकेट’ सीबीआयकडून उद्ध्वस्त
2 केंद्र सरकारपुढे राष्ट्रपतींची माघार
3 राजकीय क्षेत्रातून आजन्म हद्दपार करण्याचे प्रयत्न – नवाझ शरीफ
Just Now!
X