27 September 2020

News Flash

गुरूग्राम : चार मजली निर्माणाधीन इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली ५ ते ८ जण अडकले

एनडीआरएफचे तीन पथकं घटनास्थळी, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

(छायाचित्र- एएनआय)

हरियाणाच्या गुरुग्राम येथे 4 मजली निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. गुरूवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास गुरूग्राम येथील उल्लावास गावात ही इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५ ते ८ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अडकलेले सर्वजण कामगार असण्याची शक्यता आहे.

#Haryana: Three NDRF teams rushed to the site of building collapse in Ullawas, Gurugram. More than five people are trapped after a four-storey building collapsed early morning today pic.twitter.com/42P4vlEL7i


या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफचे तीन पथकं दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बांधकाम सुरू असलेली ही इमारत कोसळली तेव्हा या इमारतीत ५ ते ८ जण होते, आणि ते सर्व ढिगाऱ्याखाली दबले गेले अशी माहिती आहे. इमारत कोसळण्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. ही इमारत कोसळल्याने आजूबाजूच्या इमारतींचंही नुकसान झालं आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 8:44 am

Web Title: gurugram four storey building collapse people trap
Next Stories
1 प्रियंका गांधी पंतप्रधान?, प्रशांत किशोर म्हणतात…
2 अमेरिकेतील बँकेत अंदाधुंद गोळीबार, पाच जणांचा मृत्यू
3 काँग्रेसचे प्रियंकास्त्र!
Just Now!
X