ग्वाल्हेरमध्ये आजपासून करोना प्रतिबंधक लसीकरणाची मोठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. या वेळी राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी हजीरा सिव्हील रुग्णालयामध्ये पोहचून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. लसीकरणासाठी आलेल्या एका महिलाला टीळा लावून ज्योतिरादित्य शिंदेंनी नागरिकांचं प्रतिकात्मक पद्धतीने स्वागत केलं. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लसीकरणाला पाठिंबा देत असल्याचं मत व्यक्त केलं होतं त्यावरुन ज्योतिरादित्य शिंदेंनी देर आए दुरुस्त आए, असं म्हणत टोला लगावला. ग्वाल्हेरचं नाव बदलण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर ज्योतिरादित्य शिंदेंनी नामदारांचा पक्ष असणाऱ्या काँग्रेसने आधी स्वत:चं नाव बदलावं असा खोचक सल्ला दिला. (Jyotiraditya Scindia Slams Congress)

आज ५० हजार जणांचं लसीकरण

देशभरामध्ये आजपासून व्हॅक्सिन फॉर ऑल म्हणजेच सर्वांसाठी मोफत लस मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम ग्वाल्हेर जिल्ह्यामध्ये यशस्वी व्हावी म्हणून प्रशासनापासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनीच पुढाकार घेतल्याचं चित्र दिसत आहे. राज्यसभा खासदार असणारे ज्योतिरादित्य शिंदे स्वत: हजीरा येथील प्रशासकीय रुग्णालयामधील आदर्शक लसीकरण केंद्रामध्ये लोकांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हजर झाले होते. येथे उपस्थित लोकांना ज्योतिरादित्य यांनी लसीकरण करुन घेण्याची शपथ दिली. त्यांनी लसीकरणासंदर्भात बोलताना. आज जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली १० लाख लोकांचं लसीकरण केलं जाणार आहे. आज ग्वाल्हेर जिल्ह्यात ५० हजार जणांचे लसीकरण करण्याचं ध्येय समोर ठेवण्यात आलंय.

नक्की वाचा >> “एवढी चिंता राहुल यांना मी काँग्रेसमध्ये असताना असती तर…”; ‘भाजपामधील बॅकबेंचर’ वक्तव्यावर शिंदेंचं उत्तर

माजी मुख्यमंत्र्यांना टोला…

कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना शिंदे यांनी काँग्रेसहीत विरोधी पक्षांवर निशाणा साधला. जे लोक लसींसंदर्भात खोटची माहिती पसरवत होते तेच आता लसीकरणासाठी धावत धावत येत आहेत जे लोकं महामारीवरुन राजकारण होते त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरसा दाखवण्याचं काम केलं, असा टोला ज्योतिरादित्य शिंदेंनी लगावला. तसेच कमलनाथ यांनी लसीकरण मोहिमेला पाठिंबा दर्शवल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदेंनी, देर आए दुरुस्त आए असं म्हटलं. कमलनाथ यांनी लसीकरण मोहिमेला पाठिंबा दर्शवताना ट्विटरवरुन सर्वसामान्यांनी आणि काँग्रेस समर्थकांनी लस घ्यावी असं आवाहन केलं होतं.

नक्की पाहा >> Video: करोनावर मात करण्यासाठी दोन पऱ्या आल्याचं ऐकून शेकडो गावकऱ्यांनी केली गर्दी

काँग्रेसला नाव बदलावं लागेल

ग्वाल्हेरचं नाव बदलण्यासंदर्भात काँग्रेसने केलेल्या मागणीवरही ज्योतिरादित्य शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. “जेव्हा देशात आणि मध्य प्रदेशात महामारीचा फैलाव होत होता तेव्हा काँग्रेस राजकारण करत होती. काँग्रेस कधी लसीकरण करणार नाही असं सांगते, कधी लसींमध्ये मांस असल्याचं सांगते. आज ते स्वत:च लस घेण्यासाठी धावपळ करत आहेत. काँग्रेसला नाव बदलण्याची एवढीच इच्छा आहे तर त्यांना आधी स्वत:चं नाव बदलावं लागले. लोकांच्या मनामध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसला नाव बदलावं लागेल,” असा टोला ज्योतिरादित्य शिंदेंनी लगावला.

नक्की पाहा फोटो >> जगातील ५० सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे ज्योतिरादित्य शिंदेंची पत्नी

मोदी म्हणतात त्याप्रमाणे….

आपले पंतप्रधान सांगतात त्याप्रमाणे, काँग्रेस नामदारांचा पक्ष आहे तर भाजपा कामगारांचा पक्ष आहे, असा टोलाही ज्योतिरादित्य शिंदेंनी लगावला. ग्वाल्हेरचं नाव बदलून महाराणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने ठेवण्याची मागणी केली जात असून यावरुन आता मध्य प्रदेशमध्ये दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे.