दारुच्या नशेत विवाहित महिलेचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी बंगळुरुत एका जीम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. अल्वीन (२८) असे या जीम ट्रेनरचे नाव असून त्याने भररस्त्यात एका महिलेला जबरदस्तीने मिठी मारली. अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावून गेलेल्या पीडित महिलेने आरडाओरडा सुरु केल्यानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी अल्वीनला पकडले.

अल्वीन बाईकवर बसून पळून जाण्याच्या तयारीत होता. तक्रारदार महिला रस्त्यावरुन एकटी चालली होती. मी माझी बाईक थांबवून तुम्हाला कुठे सोडू का ? असे तिला विचारले.

त्या महिलेने काहीही उत्तर न देता चालणे चालूच ठेवले. मला माझा हा अपमान वाटला. मी माझी बाईक रस्त्यात उभी केली व धावत जाऊन त्या महिलेला मिठी मारली असे आरोपीने पोलिसांना सांगितले. यापूर्वी सुद्धा देशातील प्रमुख महानगरात काही ठिकाणी असे प्रकार घडले आहेत.