News Flash

..तर भारताला आर्थिक फटका!

अमेरिकेत असा निर्णय घेतला गेला, तर त्यामुळे निर्यातधिष्ठित वाढीला फटका बसेल

| March 13, 2016 02:23 am

us president, usa president, donald trump, president trump, trump to buy iphone, trump ditches android, android phone, ios, security, barack obama, boeing, air force one, market manipulation, share market, businessman, businessman donald trump, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi Samachar, Marathi latest news,news, entertainment marathi news, Bollywood news, Sports news in marathi, Health news, political news in marathi,breaking news,marathi batmya
अँड्राॅई़ड फोनपेक्षा अॅपलची सिस्टिम सुरक्षित असल्याचा दावा

एच १ बी व्हिसा बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या सूतोवाचाबाबत भारताची चिंता

भारतातून येणारे लोक अमेरिकेत कौशल्याधारित नोकऱ्या पळवतात. त्यामुळे स्थलांतरित नसलेल्या कर्मचाऱ्यांना एच १ बी व्हिसा देण्याची पद्धतच बंद करण्याचा इरादा अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. त्यावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेत असा निर्णय घेतला गेला, तर त्यामुळे निर्यातधिष्ठित वाढीला फटका बसेल, असे स्पष्ट करण्यात आले.

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी भारत व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी आयोजित केलेल्या प्रगतशील आशिया परिषदेत सांगितले, की डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडच्या अध्यक्षीय चर्चेत आपण अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यास एच १ बी व्हिसा बंद करण्याचे सूतोवाच केले होते. ती चिंतेची बाब आहे. अशा कृतीमुळे निर्यातधिष्ठित वाढीला मर्यादा येतील.

सुब्रह्मण्यम यांनी सांगितले, की सेवाधिष्ठित निर्यात प्रारूप भारताला ८ ते १० टक्के वाढीकडे नेऊ शकते, त्यामुळे एच १ बी व्हिसा पद्धत रद्द करण्याचा विचार घातक आहे. आमच्या देशातील उत्पादनाधिष्ठित वाढीपेक्षा सेवा क्षेत्रातील निर्यातधिष्ठित वाढ जास्त आहे. मध्यम कालावधीत ८-१० टक्के वाढ गाठणे शक्य आहे पण त्यासाठी उत्पादन व सेवा क्षेत्रातील निर्यातवाढही आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील काही समस्यांमुळे भारत केवळ उत्पादन क्षेत्रातील निर्यातीवर अवलंबून राहू शकत नाही. सरकारला बहुमत आहे त्यामुळे सुधारणा कार्यक्रम राबवण्याची आमची तयारी आहे.

ट्रम्प यांचा दावा

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवर असून एच १ बी व्हिसामुळे अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या नोक ऱ्या परदेशी लोक पळवतात व त्यात भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टाटा कंपनीसारख्या काही कंपन्या त्यांचे कामगार या व्हिसावर अमेरिकेत पाठवतात व ते कमी वेतनात काम करीत असल्याने अमेरिकी लोकांच्या नोक ऱ्या जातात, असे त्यांनी म्हटले होते.

ट्रम्प यांची शिकागोतील सभा रद्द

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपली शिकागोतील प्रचार सभा रद्द केली आहे. ट्रम्प यांच्या तिरस्काराच्या राजकारणाच्या निषेधार्थ हजारो जण सभेच्या ठिकाणी जमले होते आणि त्यांची ट्रम्प समर्थकांशी चकमक झाल्याने ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेणे भाग पडले.

शिकागो पॅव्हेलियन येथील इलिनिऑस विद्यापीठात शुक्रवारी रात्री होणारी सभा ट्रम्प यांनी प्रथम नियोजित वेळेपेक्षा विलंबाने घेण्याचे ठरविले. मात्र सभेसाठी जमलेल्या हजारो समर्थकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा पुढे ढकलण्यात येत असल्याचे त्यानंतर आयोजकांनी जाहीर केले.

निदर्शनांच्या कारणास्तव राजकीय सभा रद्द करण्याचा हा दुर्मिळातील दुर्मीळ प्रसंग आहे.

ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार टेड क्रूझ आणि मार्को रुबिओ यांनी दु:खद दिन असे या घटनेचे वर्णन केले आहे. तिरस्काराचे वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांनी ट्रम्प यांना दूषणे दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 2:22 am

Web Title: h1 b visa issue
टॅग : Donald Trump
Next Stories
1 भारतीय लष्कराची प्रतिमा चांगली- सुहाग
2 आयसिसच्या २२,००० सदस्यांची माहिती उघड
3 ऑस्ट्रेलियात सर्वात कमी जाडीच्या भिंगाची निर्मिती
Just Now!
X