News Flash

भारताचा मोठा शत्रू हाफिज सईदला पाकिस्तानी कोर्टाने ठरवलं दोषी

लष्कर-ए-तयैबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानच्या गुजरनावाला कोर्टाने दोषी ठरवले आहे.

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तयैबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानच्या गुजरनावाला कोर्टाने दोषी ठरवले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. हाफिज सईदशी संबंधित प्रकरणाची यापुढे पाकिस्तानातील गुजरातमधील कोर्टात सुनावणी होणार आहे. यापूर्वी लाहोर कोर्टात सुनावणी सुरु होती.

मागच्या महिन्यात १७ जुलैला हाफिज सईदला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाने आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली होती. हाफिजच्या संघटनेने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासह भारतात वेगवेगळया ठिकाणी दहशतवादी कारवाया केल्या आहेत.

भारताने त्याच्याविरोधात अनेक पुरावे पाकिस्तानला दिले. पण पाकिस्तानने मुंबई हल्ल्या प्रकरणी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाने हाफिज विरोधात २३ पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. हाफिजसोबत त्याच्या काही साथीदारांनीही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा अनेकवेळा त्याला अटक करुन काही दिवसात सोडून देण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान हाफिज विरोधात कारवाई करत असला तरी भारताला त्यावर विश्वास नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 2:50 pm

Web Title: hafiz saeed held guilty by gujranwala court dmp 82
Next Stories
1 Article 370 : जम्मू-काश्मीरच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी गाडीवरील राज्याचा झेंडा काढला
2 भाजपामधले बॅचलर्स आता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करु शकतात, भाजपा आमदाराची मुक्ताफळं
3 सुषमा स्वराज यांचा फोटो ज्याने जगाला दाखवली भारतातील महिलांची ताकद
Just Now!
X