मुंबई हल्ल्याचा मुख्य सुत्रधार व जमात उद दावा (जेयूडी) चा प्रमुख हाफिज सईदला पहिल्यांदाच पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतातील सरकारने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर बुधवारी ईद-उल-फितर ची नमाज अदा करू दिली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे हाफिजने आपल्या घराजवळील मशीदत जाऊन नमाज अदा केली.सईद हाफिजला गद्दाफी स्टेडियवरील नमाजचे नेतृत्व करायचे होते. मात्र पंजाब सरकारच्या अधिका-यांनी त्याला यासाठी परवानगी दिली नाही. खरेतर गद्दाफी स्टेडियम हाफिजचे आवडते ठिकाण आहे.

एका अधिका-याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, जर हाफिज सरकारचा आदेश डावलून नमाजसाठी गद्दाफी स्टेडियमवर गेला असता तर त्याला अटक करण्यात आली असती. त्याच्याकडे सरकारी आदेशाचे पालन करण्या शिवाय अन्य कुठलाही पर्याय नव्हता. त्यामुळेच त्याने गद्दाफी स्टेडियमवर येण्याचे टाळले. खरेतर हाफिज सईद अनेक वर्षांपासून कोणत्याही आडकाठीशिवाय गद्दाफी स्टेडियमवर ईद-उल-फितर व ईद-उल-जुहा ची नमाज अदा करण्यासाठी आलेला आहे. एवढेच नाहीतर आतापर्यंत सरकारचा त्याला सुरक्षा पुरवत आलेली आहे. सईद या ठिकाणी केवळ नमाजच अदा करत नव्हता तर प्रचंड संख्येने उपस्थित जनसमुदायासमोर भारत विरोधी विशेषता काश्मीर मुद्यावरून भडकाऊ भाषण देखील करायचा. सईदवर मुंबई हल्ल्यानंतर १० डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याच्यावर बंदी आणली आहे. या हल्ल्यात १६६ जणांचा जीव गेला होता.

इमरान खान सरकारने फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या मदतीने आपल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी तीन महिने अगोदरच दहशतवादी संघटनाविरोधात कारवाई करणे सुरू केल्यानंतर सईदला लो प्रोफाइलच ठेवले आहे. फेब्रुवारीत पॅरिसमध्ये एफएटीएफने जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा व जमात उद दावा सारख्या दहशतावादी संघटनांना होणारा निधी पुरवठा थांबण्यास अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानला ‘ग्रे’ लिस्ट मध्येच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.