मक्केत दररोज नमाज पठण

जगातील २० लाख मुस्लीम भाविक सौदी अरेबियात हज यात्रेसाठी दाखल झाले आहेत, मक्केत घनाकृती काबाभोवती जमून ते रोज नमाज पठण करीत आहेत. हाज यात्रा पाच दिवसांची असून जगातील सर्वात जास्त लोक उपस्थित असलेला हा धार्मिक कार्यक्रम असतो.

मुस्लीम धर्मात सांगितल्याप्रमाणे मनुष्य जन्मात एकदा तरी हज यात्रा करणे पुण्याचे मानले जाते. मुस्लीम जगापुढे सध्या मध्यपूर्वेतील दहशतवाद, म्यानमारमधील रोहिंग्यांची वाईट अवस्था अशा अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे.

अल्लाच्या आशीर्वादानेच मी येथे आलो आहे. पश्चिम व पूर्वेकडील मुस्लीम देशांमध्ये शांतता नांदावी अशी प्रार्थना मी अल्लाकडे करीत आहे असे ईजिप्तमधून आलेल्या इस्सम एडीन अफीफी यांनी सांगितले. हाजमध्ये महंमद पैगंबरांच्या पाऊलखुणा आहेत तसेच इब्राहिम व इस्माइल अब्राहम तसेच बायबलमधील इशमाइल हे तेथे होते.

अब्राहमने त्याचा मुलगा  इसहाक याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते, यात ख्रिश्चन, मुस्लीम व ज्यू धर्मात वेगवेगळ्या कहाण्या आहेत. यात काबा हे देवाचे घर मानले जाते. मुस्लीम लोक काबाभोवती जमून नमाज पठण करतात व नंतर इब्राहिमची पत्नी हागर ज्या दोन टेकडय़ांवर गेली होती तिकडे जातात. मक्केतील मशीद ही जगातील सर्वात मोठी मशीद तेथे आहे. मक्केकडे जाताना लोक मदिनाला भेट देतात तेथे प्रेषित महंमदाचे दफन करण्यात आले होते. पहिली मशीद तेथे होती. मक्केतील प्रार्थनेनंतर लोक माउंट अराफतला उद्या जातील., तेथून ते मुझदालिफा येथे जाणार आहेत. नंतर मिना येथे तीन दिवस सैतानाला दगड मारण्याचा कार्यक्रम होईल. हज यात्रा संपल्यावर पुरुष त्यांचे के स काढून टाकतात. स्त्रियाही काही प्रमाणात केस कापतात.

हज यात्रेचा शेवट ‘इद उल अदा’ने होतो. त्या दिवशी इब्राहिम हा त्याच्या मुलाचा बळी देण्यास तयार झाला होता. त्यामुळे या दिवशी बकरे कापून गरीब लोकांना मांस वाटले जाते. तीन वर्षांपूर्वी २४ सप्टेंबर २०१५ रोजी मिना येथे चेंगराचेंगरीत २४२६ लोक मारले गेले होते. सरकारी आकडा मात्र ७६९ ठार व ९३४ जखमी असा होता. आताच्या हाज यात्रेत घातपाताचा इशारा अल काईदाच्या दहशतवाद्यांनी दिला आहे.