शेवेचे छोटेसे दुकान ते हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झाले. यकृताच्या गंभीर आजारामुळे ते त्रस्त होते. गेले तीन महिने सिंगापूरमधील रूग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी अग्रवाल वयाच्या ५७ व्या वर्षात पदार्पण करणार होते, मात्र आदल्या दिवशी त्यांचे निधन झाले. यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंबीय हे सिंगापूरमध्येच अडकले असून अग्रवाल यांच्यावर पार्थिवावर सिंगापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे.

अग्रवाल यांना यकृताचा गंभीर आजार होता आणि जानेवारीत सिंगापूरच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती, परंतु त्यानंतर एक संसर्ग उद्भवल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे त्यांना ICU मधून अतिउच्च दक्षता विभागात हलवण्यात आले. परंतु अखेर त्यांचे शुक्रवारी निधन झाले. लॉकडाउनमुळे महेश अग्रवाल यांचे कुटुंबीय भारतात परतू शकले नाहीत.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
Girl Dies After Eating Cake
१० व्या वाढदिवशी खाल्लेल्या केकने चिमुकलीचा मृत्यू, झोमॅटोची हॉटेलवर कारवाई; कुटुंबाने सांगितलं पूर्ण प्रकरण
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?
महेश अग्रवाल

 

सिंगापूरमध्ये त्यांना हिंदू रितीनुसार अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सिंगापूरच्या नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश अग्रवाल यांचे निधन झाले, तेव्हा त्यांची पत्नी मीना आणि मुलगी अवनी त्यांच्यासोबत सिंगापूरमध्ये होते.

उपचारासाठी महेश आणि त्यांची पत्नी व मुलगी सिंगापूरमध्ये होते, मात्र आता त्यांची भारतात येण्याची इच्छा आहे. पण सध्या देशभरात लॉकडाउन असल्याने हे शक्य नाही. या दोघींनीही भारतीय दूतावासात भारतात आपल्या घरी परत जाण्यासाठी अर्ज केला होता, मात्र मंगळवारपासून सिंगापूर येथेही लॉकडाऊन सुरु होणार आहे. त्यामुळे या दोघींचे भारतात येणे कितपत शक्य आहे याबाबत सांगता येणार नाही. दरम्यान एका वृत्तानुसार, बुधवारी पहाटे त्यांना दिल्लीत परत घेऊन येण्यासाठी एका विमानाचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार तेथे एकूण १३०० हून अधिक करोना संक्रमित रूग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.