शेवेचे छोटेसे दुकान ते हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झाले. यकृताच्या गंभीर आजारामुळे ते त्रस्त होते. गेले तीन महिने सिंगापूरमधील रूग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी अग्रवाल वयाच्या ५७ व्या वर्षात पदार्पण करणार होते, मात्र आदल्या दिवशी त्यांचे निधन झाले. यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंबीय हे सिंगापूरमध्येच अडकले असून अग्रवाल यांच्यावर पार्थिवावर सिंगापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्रवाल यांना यकृताचा गंभीर आजार होता आणि जानेवारीत सिंगापूरच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती, परंतु त्यानंतर एक संसर्ग उद्भवल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे त्यांना ICU मधून अतिउच्च दक्षता विभागात हलवण्यात आले. परंतु अखेर त्यांचे शुक्रवारी निधन झाले. लॉकडाउनमुळे महेश अग्रवाल यांचे कुटुंबीय भारतात परतू शकले नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haldiram bhujiawala owner mahesh agrawal dies in singapore his wife and daughter stuck there due to coronavirus lockdown vjb
First published on: 06-04-2020 at 10:14 IST