09 August 2020

News Flash

मालदामध्येही महिलेचा होरपळलेल्या अवस्थेतील मृतदेह

महिलेला जाळण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासातून सूचित होत आहे.

| December 6, 2019 01:36 am

प्रतिनिधिक छायाचित्र

बलात्कार झाल्याचाही संशय

मालदा : हैदराबादधील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्य़ातील आंब्याच्या बागेत एका महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे. या महिलेवर बलात्कार करून त्यानंतर तिला जाळण्यात आले असावे, असा संशय एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

या महिलेचा मृतदेह जळल्याने तिची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे पोलीस उपअधीक्षक प्रशांत देवनाथ यांनी सांगितले. स्थानिक शेतकऱ्यांना या महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आणि त्यांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली.

ही महिला साधारणपणे २० वर्षे वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचे आढळले आहे, मृतदेह शवविच्छेदनासाठी मालदा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

महिलेला जाळण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासातून सूचित होत आहे. तिच्या मृतदेहाजवळ चपलांची जोडी आणि काडय़ापेटीतील अनेक काडय़ा आढळल्या आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 1:36 am

Web Title: half burnt body of a woman found in malda zws 70
Next Stories
1 बाबरी मशीद पडल्याच्या घटनेचा स्मृतीदिन
2 उन्नावमध्ये पुन्हा क्रौर्याची परिसीमा ; बलात्कारपीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
3 मध्य प्रदेशात बस अपघातात ९ जण ठार, १० जखमी
Just Now!
X