06 July 2020

News Flash

पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांच्यावर हल्ला

तालिबानी दहशतवाद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे, पाकिस्तानातील लोकप्रिय पत्रकार व जिओ टीव्हीचे संपादक हमीद मीर यांच्यावर शनिवारी चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

| April 19, 2014 06:38 am

तालिबानी दहशतवाद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे, पाकिस्तानातील लोकप्रिय पत्रकार व जिओ टीव्हीचे संपादक हमीद मीर यांच्यावर शनिवारी चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मीर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तालिबानींनीच मीर यांच्यावर हल्ला केला असावा असा कयास आहे.
हमीद मीर यांचा सध्या जिओ टीव्हीवरील ‘कॅपिटल टॉक’ हा राजकीय विषयांवरील चर्चासत्राचा कार्यक्रम तुफान लोकप्रिय ठरला आहे.
शनिवारी कराची विमानतळावरून ते कार्यालयाकडे जात असताना येथील नाथा खान पुलावर दोन बाइकवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर  गोळीबार केला. या हल्ल्यात मीर जखमी झाले.
नोव्हेंबर, २०१२ मध्येही मीर यांच्या कारच्या खाली बॉम्ब पेरण्यात आला होता. तेव्हापासून ते सातत्याने दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2014 6:38 am

Web Title: hamid mir shot injured in karachi
Next Stories
1 ‘एव्हरेस्ट’च्या वाटेवर मृत्यूचे तांडव!
2 नोबेल विजेते गॅब्रिएल मार्क्वेझ कालवश
3 उत्तर प्रदेशला धुळीच्या वादळाचा तडाखा, २७ठार
Just Now!
X