News Flash

वाराणशीच्या न्यायालय परिसरात बॉम्ब सापडला

वाराणशीच्या जिल्हा न्यायालयाच्या परिसरात शनिवारी एक हातबॉम्ब सापडल्यामुळे या ठिकाणी दहशत पसरली होती.

| April 24, 2016 12:02 am

वाराणशीच्या जिल्हा न्यायालयाच्या परिसरात शनिवारी एक हातबॉम्ब सापडल्यामुळे या ठिकाणी दहशत पसरली होती.
एका पॉलिथिनच्या पिशवीत गुंडाळलेला हा बॉम्ब कुटुंब न्यायालयाजवळ सकाळी ९.४०च्या सुमारास आढळला. यानंतर पोलिसांनी हा संपूर्ण भाग रिकामा करवला आणि बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबवली. हा बॉम्ब नंतर निकामी करण्यात आला, असे पोलीस अधीक्षक आकाश कुल्हारी म्हणाले.
गंगा नदीच्या घाटांवर तसेच या भागातील इतर धार्मिक स्थळांवर शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 12:02 am

Web Title: hand grenade found in varanasi court premises
Next Stories
1 दिवसाढवळ्या तरुणीचे अपहरण आणि बलात्कार
2 राष्ट्रपती मुखर्जी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर
3 उत्तराखंडमध्ये २७ पर्यंत राष्ट्रपती राजवट
Just Now!
X