19 September 2020

News Flash

राहुल गांधींना चित्रपट निर्मात्यानं सुनावलं; जनता जागी झाली आहे, तुम्ही सेऊललाच जा

उपरोधिक सल्ला देणार ट्विट

एनआरसी आणि सुधारित नागरिक कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते. देशात विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरलेले असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेतेच परदेश दौऱ्यावर गेल्यानं राहुल गांधी यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यावरून प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी राहुल गांधी यांच्यावर परखड शब्दात टीका केली आहे.

एनआरसी आणि सुधारित नागरिक कायद्याला आसाम, ईशान्येकडील राज्यांसह देशभरात ठिकठिकाणी विरोध होत आहे. या कायद्याविरोधातच दिल्लीतील जामिया इस्लामिया विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर विद्यापीठात घुसूनही मारहाण केली. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. याच काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले होते.

देशातील परिस्थिती तणावपूर्ण असताना राहुल गांधी विदेश दौऱ्यावर गेल्यानं त्यांच्यावर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टीका केली. त्यावर राहुल गांधी यांचा दक्षिण आफ्रिका दौरा पूर्वनियोजित होता, असा खुलासा काँग्रेसनं केला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी राहुल गांधी कडाडून टीका केली आहे.

हंसल मेहता यांनी राहुल गांधी यांना उपरोधिक सल्ला देणार ट्विट केलं आहे. मेहता म्हणाले, “राहुल गांधींनी काहीच बोलू नये, हेच चांगलं राहिल. ते जर पुन्हा सेऊलला गेले तर त्यापेक्षाही अधिक चांगल आहे. किंवा टोक्यो. किंवा बुसान. काही आयडिया हवी असेल तर त्यांनी मला सांगावं. पण, या देशातील जनतेपासून त्यांनी दूर राहावं. या देशातील जनता जागी झाली आहे आणि त्यांना आता तुमची (राहुल गांधी) गरज नाही,” अशी टीका हंसल मेहता यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 12:40 pm

Web Title: hansal mehta gave advice to rahul gandhi it is best if you go back to seoul bmh 90
Next Stories
1 भाजपाने गोव्यासारखा प्रयोग केला, तर तुम्ही तयार आहात का? राजीव सातव म्हणाले…
2 झारखंडही गेलं! ; अवघ्या दीड वर्षात महाराष्ट्रासह सात राज्ये झाली भाजपामुक्त
3 Jharkhand election: कोणताही मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा जिंकला नाही; रघुवर दास अपवाद ठरणार?
Just Now!
X