18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

आनंदी देशांच्या यादीत भारताची घसरण

भारत गेल्या वर्षीच्या तुलनेत चार अंकांनी अधिक खाली आला

पीटीआय, संयुक्त राष्ट्रसंघ | Updated: March 21, 2017 12:14 PM

जगातील आनंदी देशांच्या यादीत भारत गेल्या वर्षीच्या तुलनेत चार अंकांनी अधिक खाली आला असून सध्या १२२व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता जगातील आनंदी देशांच्या यादीत भारत हा चीन, पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही मागे पडला आहे. जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत नॉर्वेचा सर्वात वरचा क्रमांक आहे. अमेरिकाही गेल्या वर्षीपेक्षा एका क्रमांकाने घसरली असून सध्या त्यांचा १४ वा क्रमांक आहे.

द वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१७ने जगातील १५५ देशांच्या आनंदाच्या स्तराची पाहणी केली, त्यामध्ये नॉर्वेने गेल्या वर्षीपेक्षा तीन अंकांनी वर उडी घेतली आणि डेन्मार्कला मागे टाकले आहे. गेल्या चार वर्षांपैकी तीन वर्षे डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर होता.

भारताचा २०१३-१४ मध्ये ११८ वा क्रमांक होता तो आता १२२व्या क्रमांकावर गेला आहे. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक स्थिती, आरोग्यदायी जीवनशैली, भ्रष्टाचाराबाबतचा दृष्टिकोन आदी निकषांवरून आनंदाचे मोजमाप करण्यात आले आहे. चीन (७९), पाकिस्तान (८०), नेपाळ (९९), बांगलादेश (११०), इराक (११७) आणि श्रीलंका (१२०) यांनी भारताच्या पुढे मजल मारली आहे.

आंतरराष्ट्रीय आनंदी निर्देशांक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात येथे हा अहवाल जारी करण्यात आला. नॉर्वेपाठोपाठ डेन्मार्क, आइसलॅण्ड, स्वित्र्झलड, फिनलॅण्ड, नेदरलॅण्डस, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडन यांचा क्रमांक आहे.

 

First Published on March 21, 2017 12:25 am

Web Title: happy country in the world