News Flash

राहुल गांधी, प्रियांका गांधी हे पेट्रोल बॉम्ब; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

CAA आणि NRC या दोहोंविरोधात देशभरात जनक्षोभ उसळला आहे.

भाजपा नेते आणि हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी लाइव्ह पेट्रोल बॉम्ब असल्याचं वादग्रस्त वक्तव्य वीज यांनी केलं आहे. त्यांनी ट्विट करत राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला.

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यापासून सावधान राहा, कारण ते लाइव्ह पेट्रोल बॉम्ब आहेत, असं वादग्रस्त ट्विट अनिल वीज यांनी केलं आहे. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आग भडकते आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होतं, असंही त्यांनी नमूद केलं आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांना मंगळवारी मेरठमध्ये अडवण्यात आलं होतं. हे दोघेही मेरठमध्ये CAA आणि NRC विरोधात जे आंदोलन झालं त्यामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयाच्या भेटीसाठी हे दोघे जात होते. त्यानंतर वीज यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

CAA आणि NRC या दोहोंविरोधात देशभरात जनक्षोभ उसळला आहे. या दोन्ही कायद्यांना सात राज्यांमध्ये विरोध होतो आहे. आसाम तर याविरोधात पेटलं. उत्तर प्रदेशातही या विरोधात पडसाद उमटले. दरम्यान मेरठमध्ये हे आंदोलन सुरु असताना ज्यांचे बळी गेले त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी आले होते. त्यांना यावेळी पोलिसांनी अडवलं. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचारात जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी राहुल आणि प्रियंका गांधी हे जेव्हा मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांना भेटू देण्यात आलं नाही. पोलिसांनी त्यांची गाडी अडवली.

यापूर्वीही वीज यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी इटलीहून येऊन भारताचं नागरिकत्व घेतलं. परंतु शेजारी देशांमध्ये हाल सोसत असलेल्या हिंदूंच्या नागरिकत्वाला त्या विरोध करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 8:09 am

Web Title: harayana home minister anij criticize congress priyanka gandhi and rahul gandhi over caa nrc jud 87
Next Stories
1 अमित शहांचे घूमजाव!
2 आता राष्ट्रीय लोकसंख्या सूची अद्ययावत करण्याचा संकल्प
3 संरक्षणप्रमुख पदाला मंत्रिमंडळाची मंजुरी
Just Now!
X