News Flash

दूधवाल्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या पतीची पत्नीनेच केली हत्या; प्रियकराची घेतली मदत

पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केलीय

फाइल फोटो (सौजन्य: रॉयटर्स)
उत्तराखडंमधील हरिद्वारमध्ये विवाहबाह्य संबंधांमधून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचे आणि दूधवाल्याचे प्रेमसंबंध असल्याने या महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केली. या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पूर्ण जाळण्याआधीच त्यांनी ज्या जंगलामध्ये मृतदेह जाळला तिथून पळ काढला. विचित्र गोष्ट म्हणजे नंतर ही महिलाच आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस स्थानकामध्ये गेली. मात्र पोलिसांना या महिलेच्या वागणुकीसंदर्भात शंका आली आणि त्यांनी तिची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या महिलेने आपला गुन्हा कबुल केला.

हरिद्वारमधील पथरी पोलीस स्थानकामध्ये ११ मे रोजी अंजना नावाच्या महिलेने तिचा पती संजीव बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र काही दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना महिलेची भूमिका संक्षयास्पद वाटू लागली आणि पोलिसांनी अंजनाची चौकशी केली. त्यावेळी अंजनाने आपला गुन्हा कबुल केला. अंजनाने केलेला खुलासा ऐकून पोलिसांनाही धक्का बसल्याचं न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. अंजनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पती संजीवच्या माध्यमातून तिची आणि शेजारच्या गावामध्ये दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिवकुमारची ओळख करुन दिली. हळूहळू अंजना आणि शिवकुमार यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र यासंदर्भात समजल्यानंतर संजीव या दोघांनाही त्याच्या उपस्थितीमध्ये शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत असे. नंतर यावरुन तो त्यांना ब्लॅकमेल करुन बदनामी करण्याची धमकीही द्यायचा.

दोन्ही आरोपांनी पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावण्यात याची माहिती दिली. जंगलामध्ये पोलिसांना संजीवचा मृतदेह अर्धवट जाळालेल्या अवस्थेत सापडला. एकीकडे संजीव या दोघांच्या प्रेमामध्ये अडचण ठरत होता तर दुसरीकडे तो त्यांना समाजामध्ये बदनाम करण्याची धमक्या देत होता. त्यामुळेच अंजना आणि शिवकुमारने संजीवचा काटा काढण्याचं ठरवलं. तीन जण एकाच वेळी शरीरसंबंध ठेवणार असल्याचं सांगून त्यांनी संजीवला भेटायला बोलवलं आणि रस्सीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर एका गोणीमध्ये संजीवचा मृतदेह भरुन तो जंगलात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला.

अंजनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संजीव तिला परपुरुषासोबत त्याच्या देखतच शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडायचा. तसेच तो तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही करायचा. अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवण्यासाठी संजीव माझ्यावर दबाव आणायचा असंही अंजनाने पोलिसांना सांगितलं आहे. एसपी प्रमेंद्र डोभाल यांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 6:59 pm

Web Title: haridwar wife killed husband with help of lover milkman scsg 91
Next Stories
1 लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण नगण्य- आरोग्य मंत्रालय
2 विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती निर्माण केलीय; योगी आदित्यनाथांचा आरोप
3 मिठाईशिवाय कळ निघेना….सरळ बोर्ड घेऊनच रस्त्यावर उतरला!
Just Now!
X