News Flash

भारताची तुलना नाझी राजवटीशी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराला हर्षा भोगलेंनी सुनावलं

"भारत देश सध्या तुटतोय," असंही हा ऑस्ट्रेलियन पत्रकार म्हणाला

हर्षा भोगलेंनी सुनावलं

देशभरामधील वेगवेगळ्या ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन आंदोलने आणि मोर्चे काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन पत्रकार डॅनीस फ्रीडमॅन याने भारतातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. इतकचं नाही डॅनीसने ‘जगातील कोणत्याही नेत्याची हिटलरशी इतक्या वेळा तुलना झालेली नाही,’ असा संदर्भ देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. मात्र याचवरुन भारतीय क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी डॅनिसला सुनावले आहे.

देशामधील आंदोलने आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हर्षा यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी देशातील तरुण आंदोलन करत रस्त्यावर उतरला असून त्याचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे अशा आशयाचे वक्तव्य केलं असून जुन्या आठवणींचा संदर्भही दिला आहे. आपण भारतीय आहोत हे आपलं भाग्य आहे असंही या पोस्टच्या शेवटी हर्षा यांनी म्हटलं आहे.

हर्षा यांच्या या पोस्टचा आधार घेत डॅनीसने ट्विट करत भारतातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. “या पोस्टसाठी मी हर्षाचे कौतुक करेन. त्याचा भारत देश सध्या तुटतोय. जगातील कोणत्याही देशातील नेत्याची अथवा सत्ताधारी पक्षाची तुलना इतक्या सातत्याने नाझीशी झालेली नाही. या विषयावर आपण सर्वांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या विषयावर कठोर भूमिका घेणाऱ्या आपणमध्ये गौतम गंभीरचा समावेश मी करणार नाही. तो अपवाद आहे कारण त्याने दुफळी निर्माण करणाऱ्या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असं ट्विट डॅनीसने केलं होतं.

डॅनीसच्या या टीकेला हर्षा यांनी ट्विटवरुनच चोख प्रत्युत्तर दिलं आहे. “नाही डॅनिस. माझा भारत देश विभागलेला नाही. भारत हा उत्साही तरुणांचा देश असून हे तरुण अनेक भन्नाट गोष्टी करत आहे. आमचा भारत देश हा पूर्णपणे कार्यरत आणि परिपक्व लोकशाही देश आहे. आम्ही आमच्यातील मतभेद, निराश करणाऱ्या गोष्टींबद्दल उघडपणे बोलतो. असं असलं तरी आम्ही कट्टर भारतीयच आहोत. तू तुलना करण्यासाठी जो शब्द (नाझी) वापरला आहे तसे आम्ही कधीच नव्हतो आणि नसणार,” असं ट्विट हर्षा यांनी केलं आहे.

अवघ्या तासाभरामध्ये हर्षा यांच्या या ट्विटला दीड हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. अनेकांनी डॅनीसला लोकशाही म्हणजे काय याचा अर्थच समजला नसल्याची टीका या ट्विटखाली दिलेल्या प्रतिक्रियांमधून केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 11:41 am

Web Title: harsha bhogle slams journalist dennis freedman for comparing india with nazi rule scsg 91
Next Stories
1 औषधांच्या खोट्या जाहिराती केल्यास दाखल होणार फौजदारी खटला
2 असदुद्दीन ओवेसी अमित शाह यांच्यावर भडकले, म्हणाले तुम्हीच संसदेत सांगितलं…
3 Video: केरळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर हल्ला, थरार कॅमेरात कैद
Just Now!
X