29 September 2020

News Flash

अमेरिकेत ‘हार्वे’ वादळाचे थैमान

पाच जण ठार; सव्वा कोटी नागरिकांना तडाखा 

| August 29, 2017 02:27 am

पाच जण ठार; सव्वा कोटी नागरिकांना तडाखा 

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात अभूतपूर्व अशा भीषण चक्रीवादळाने थैमान घातले आहे. प्रलयकारी पूर आणि मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून अशा भयानक वातावरणाने पाच जणांचे बळी घेतले आहेत. सुमारे १३ दशलक्ष लोक या परिस्थितीला तोंड देत आहेत.

हा अभूतपूर्व पाऊस बुधवापर्यंत ५० इंचांनी वाढेल असे भाकीत हवामानतज्ज्ञांनी केले आहे. ह्य़ूस्टन भागात मुसळधार पावसाचा पट्टा रात्रभरात कूच करण्याची अपेक्षा आहे. या भागात अनर्थकारी आणि जिवाला धोका उत्पन्न करणारी मुसळधार पाऊस व पुराची आणीबाणीची परिस्थिती कायम राहील असेही दिसते आहे.

एवढय़ा प्रचंड प्रमाणावरील पूर गेल्या ८०० वर्षांमध्ये प्रथमच आलेला असल्याचे फोर्ट बेंड काऊंटी जज रॉबर्ट हर्बर्ट यांनी सोमवारी एका निवेदनात सांगितले. गेल्या १३ वर्षांमधील सगळ्यात शक्तिशाली अशा ‘हार्वे’ चक्रीवादळाने अमेरिकेच्या मुख्य भूमीला तडाखा दिल्यानंतर आलेला हा पूर टेक्सास किनाऱ्यावर धडकल्यानंतर पाच जण ठार झाले आहेत.

२०० भारतीय विद्यार्थी अडकले

ह्य़ूस्टन/ नवी दिल्ली : टेक्सासला ‘हार्वे’ या चक्रीवादळाने तडाखा दिल्याने आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे ह्य़ूस्टन विद्यापीठात अडकून पडलेल्या किमान २०० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातील भारतीय- अमेरिकी लोकांकडून या विद्यार्थ्यांना अन्न व इतर साहित्य पुरवण्यात येत आहे. ह्य़ूस्टनमधील भारताचे कॉन्सुल- जनरल अनुपम राय हे या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून त्यांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवून आहेत. शालिनी व निखिल भाटिया या २ भारतीय विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीत सांगितले. ह्य़ूस्टन विद्यापीठातील सुमारे २०० भारतीय विद्यार्थी गळ्यापर्यंतच्या पाण्याने वेढले गेल्याचे कॉन्सुल जनरलने आपल्याला सांगितले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांच्यापर्यंत पोहचण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही स्वराज यांनी ट्विटरवर लिहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 2:27 am

Web Title: harvey storm in us
Next Stories
1 लष्कराच्या विशेष रेल्वेगाडीतून स्मोक बॉम्बचे खोके चोरीला
2 राणेंच्या भाजपप्रवेशाबाबत गूढ कायम
3 केजरीवालांना बळ; दिल्लीत दणदणीत विजय
Just Now!
X