News Flash

रिक्षाचालकाने दिला दगा, १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सोहना बस थांब्यावर तरुणी अलीगढला जाणाऱ्या बसची वाट बघत थांबली होती. यादरम्यान तिथे एक रिक्षाचालक आला

संग्रहित छायाचित्र

हरयाणातील गुरुग्राममध्ये १९ वर्षांच्या तरुणीवर रिक्षाचालक व त्याच्या चार साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सोहना बस थांब्यावर तरुणी अलीगढला जाणाऱ्या बसची वाट बघत थांबली होती. यादरम्यान तिथे एक रिक्षाचालक आला. त्याने पीडित तरुणीला तू चुकीच्या बस थांब्यावर थांबल्याचे सांगितले. यानंतर त्याने पीडितेला गुरुग्राममधील बस डेपोत सोडतो, असे सांगत तिला रिक्षेत बसायला सांगितले. पीडित तरुणीनेही रिक्षाचालकावर विश्वास ठेवला आणि त्याच्या रिक्षेत बसली. मात्र, त्याने रिक्षा गुरुग्रामच्या दिशेने न नेता निर्जनस्थळी नेली. काही अंतरावर त्याचे चार साथीदार थांबले होते. ते देखील रिक्षेत बसले. यानंतर त्या सर्वांनी पीडितेला झाडाआड नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्यांनी पीडितेला तिथेच सोडून घटनास्थळावरुन पळ काढला. १९ वर्षांची पीडित तरुणी ही बांधकाम साईटवर मजुरी करते. बुधवारी सकाळी पीडितेने घर गाठले आणि त्यांना तिच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 5:22 pm

Web Title: haryana 19 year old woman gangraped by autorickshaw driver and 4 others in gurugram
Next Stories
1 जिन्नाच्या फोटोला विरोध करणाऱ्यांनी गोडसेच्या मंदिरालाही विरोध करावा – जावेद अख्तर
2 FB बुलेटीन: उत्तर भारतात वादळाचे ६० बळी, CSK कडून सचिनचा अपमान व अन्य बातम्या
3 महिला सहकाऱ्यावर जडलं प्रेम, तिला मिळवण्यासाठी प्रियकराची केली हत्या
Just Now!
X