30 May 2020

News Flash

२२ वर्षीय विवाहित महिलेवर ४० जणांकडून सामूहिक बलात्कार

ही महिला नोकरीच्या शोधात बाहेर पडली होती, तिच्या नवऱ्याच्या मित्राने तिला नोकरी मिळवून देतो असे आश्वासन दिले होते.

संग्रहित छायाचित्र

२२ वर्षांच्या विवाहितेवर ४० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या विवाहितेला एका गेस्ट हाऊसवर डांबून ठेवण्यात आले होते. आपल्यावर ४० जणांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हरियाणातील पंचकुलात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. १५ ते १८ जुलै या चार दिवसांमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. चंदीगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मोरानी हिल्स येथील एका गेस्ट हाऊसमध्ये पीडितेला डांबून ठेवण्यात आले होते अशीही माहिती पुढे आली आहे. ही मुलगी नोकरीच्या शोधात घराबाहेर पडली होती.

चाळीस नराधमांपैकी एकाला पीडित महिला ओळखते. माझ्या नवऱ्याच्या मित्राने मला नोकरीला लावतो असे सांगितले त्याने मला गेस्ट हाऊसला नेले होते असे या महिलेने आपल्या कबुली जबाबात सांगितले आहे. या प्रकरणी गेस्ट हाऊसच्या दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांचीही कसून चौकशी सुरु केली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून नराधमांचा शोध सुरू आहे असेही पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 6:53 pm

Web Title: haryana 22 year old alleges rape by 40 men for four consecutive days
Next Stories
1 दहशतवादी हल्ल्यापेक्षा खड्डे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त – सर्वोच्च न्यायालय
2 इन आखोंकी मस्ती के….राहुल गांधींमुळे नेटकऱ्यांना झाली प्रियाची आठवण
3 BLOG: ‘होय मी हिंदू आहे’ का म्हणाले राहुल गांधी?
Just Now!
X