News Flash

पती- पत्नीच्या भांडणात मुलीचा बळी, महिलेने केली १२ वर्षांच्या मुलीची हत्या

रोहतकमध्ये सुमन लता (वय ३८) आणि तिची १२ वर्षांची मुलगी राहते. महिलेचा पती भिवानीतील मंदिरात पुजारी असून या दाम्पत्याला १४ वर्षांचा मुलगाही आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

पती- पत्नीच्या भांडणात रोहतकमध्ये १२ वर्षांच्या मुलीला जीव गमवावा लागला. संतापाच्या भरात ३८ वर्षांच्या महिलेने स्वत:च्याच १२ वर्षांच्या मुलीची हत्या केली असून हत्या केल्यानंतर महिला पोलिसांना शरण गेली आहे.

रोहतकमध्ये सुमन लता (वय ३८) आणि तिची १२ वर्षांची मुलगी राहते. महिलेचा पती भिवानीतील मंदिरात पुजारी असून या दाम्पत्याला १४ वर्षांचा मुलगाही आहे. मात्र, मोखडा गावात नातेवाईकांच्या घरी राहतो. शनिवारी रात्री सुमनचे तिचे पती कुमार यांच्याशी फोनवर भांडण झाले. या भांडणाचे परिणाम भोगावे लागतील, असे तिने पतीला सांगितले होते. फोन ठेवल्यानंतर सुमनकडे तिची मुलगी नॅन्सीने वडिलांकडे जाण्याचा हट्ट धरला. यामुळे सुमन आणखी संतापली. तिने लाकडी दांडक्याने मुलीला बेदम मारहाण केली. यात त्या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास सुमनने पतीला आणि पोलिसांना फोन करुन मुलीच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी सुमनला अटक केली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2018 11:52 am

Web Title: haryana 38 year old woman kills 12 year old daughter to death after spat with husband
Next Stories
1 मुस्लिमांपेक्षा गायी जास्त सुरक्षित – शशी थरुर
2 अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करु नका; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3 भाजप-संघाकडून शिका, राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्ते-नेत्यांना सल्ला
Just Now!
X