News Flash

तरुणीचा पाठलाग करणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाला अटक

आरोपी मुलगा घेतोय एलएलबीचे शिक्षण

सुभाष बराला (संग्रहित छायाचित्र)

हरयाणामधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाने एका तरुणीचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यधूंद अवस्थेत असलेल्या विकास बराला (वय २३) आणि त्याचा मित्र आशिष कुमार (वय २२) या दोघांनी कारमधून तरुणीचा पाठलाग केला असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

शुक्रवारी एक तरुणी रात्री साडेबाराच्या सुमारास तिच्या कारमधून सेक्टर ९ येथून पंचकुलाच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. यादरम्यान बराला आणि कुमार या दोघांनी तिचा पाठलाग सुरु केला. शेवटी पीडित तरुणीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने या दोघांना अटक केली. अटकेनंतर पाठलाग करणारा तरुण हा भाजप प्रदेशाध्यक्षाचा मुलगा असल्याचे समोर आले. विकास ज्या कारमधून तरुणीचा पाठलाग करत होता ती कार बराला यांच्या नातेवाईकाची होती. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.

‘नियंत्रण कक्षात एका तरुणीने फोन करुन पांढऱ्या रंगाच्या कारमधील दोन तरुण पाठलाग करत असल्याची माहिती दिली. यानुसार आम्ही त्या तरुणांना अटक केली. पीडित तरुणी ही आयएएस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे समजते. तर बराला आणि त्याचा मित्र आशिषकुमार हे दोघेही एलएलबी करत असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 4:28 pm

Web Title: haryana bjp president subhash baralas son vikas and his friend held for reportedly stalking woman
टॅग : Bjp,President
Next Stories
1 मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना जनतेसमोरच गोळ्या घातल्या पाहिजेत: जगनमोहन रेड्डी
2 “सामाजिक गैरप्रकारांमुळे अर्थव्यवस्थेवर कायमस्वरूपी परिणामांची शक्यता”
3 अमरावतीत सुरू होणार देशातलं सर्वात मोठं ‘बी स्कूल’
Just Now!
X