07 March 2021

News Flash

आंदोलनाला राजकीय फूस – खट्टर

चर्चेसाठी केंद्राचे ३ डिसेंबरला पाचारण

केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला काही राजकीय पक्ष आणि संघटनांची फूस असल्याचा आरोप हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी शनिवारी केला.

या वेळी खट्टर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावरही टीका केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर आपण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, तीन दिवस त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरीही अमरिंदरसिंग यांनी प्रतिसाद दिला नाही, असेही खट्टर म्हणाले.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून पंजाबमधील आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना दिशा दाखविण्यात येत होती, हा एक कट होता, असा दावाही खट्टर यांनी गुरगाव येथे वार्ताहरांशी बोलताना केला. पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले असून त्याला काही राजकीय पक्ष आणि संघटनांची फूस आहे, असे खट्टर म्हणाले.

या आंदोलनामध्ये हरयाणातील शेतकरी सहभागी झालेले नाहीत, त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो, त्याचप्रमाणे गेल्या दोन-तीन दिवसांपासून हरयाणा पोलिसांनी संयम पाळला, त्याबद्दल आपण पोलिसांचे कौतुक करतो, असेही खट्टर म्हणाले.

दिल्लीकडे आगेकूच

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या दिल्ली चलो मोर्चातील काही गटांची आगेकूच शनिवारी सुरू झाली असून रात्रभर हे शेतकरी एका ठिकाणी थांबले होते. सिंघू व टिकरी येथे सीमेवर अनेक शेतकरी थांबले आहेत. पोलिसांनी परवानगी दिलेल्या मैदानावर जायचे की नाही याबाबत निर्णय झालेला नाही.

चर्चेसाठी केंद्राचे ३ डिसेंबरला पाचारण

किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते सरवान सिंग पंधेर यांनी सांगितले की, आम्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह शंभू सीमेवरून हरयाणात प्रवेश करणार आहोत. अमृतसर येथून शेतकऱ्यांनी आगेकूच सुरू केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने येत्या तीन डिसेंबरला पंजाबच्या शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:54 am

Web Title: haryana cm manohar lal khattar farmers protest in haryana mppg 94
Next Stories
1 उत्तर प्रदेशात विवाहासाठीच्या धर्मातराविरोधात वटहुकूम जारी
2 पेनसिल्वेनिया : ट्रम्प यांचे अपील फेटाळले
3 पूर्व लडाख सीमेवर भारताचे सागरी कमांडो!
Just Now!
X